चोपडा महाविद्यालयात द्वितीय वर्ष वनस्पती शास्त्र विषयाची अभ्यासक्रम पूर्नरचना कार्यशाळा उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात द्वितीय वर्ष वनस्पती शास्त्र विषयाची अभ्यासक्रम पूर्नरचना कार्यशाळा उत्साहात संपन्न:

चोपडा: येथील दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागामार्फत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या सौजन्याने नवीन शैक्षणिक धोरणानुसार द्वितीय वर्ष विज्ञान वनस्पतीशास्त्र विषयाची अभ्यासक्रम पूर्नरचना कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेचे उदघाटन वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.एम.बी.पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.
याप्रसंगी वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.एम.बी.पाटील तसेच प्राचार्य डॉ. डी.ए.सुर्यवंशी, विभाग प्रमुख डॉ आर.एम.बागुल, वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.विद्या पाटील, डॉ.संभाजी पाटील, डॉ.सुनील पाठक, डॉ. तन्वीर खान, उपप्राचार्य प्रा.नरेंद्र कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल चौधरी, समन्वयक डॉ. शैलेश वाघ यांच्यासह कबचौ उमवि परिक्षेत्रातील बहुसंख्य प्राध्यापक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक प्रा.डॉ.आर.एम. बागुल यांनी केले. याप्रसंगी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात करण्यात आलेले बदलांनुसार अपेक्षित विद्यार्थी विकास व रोजगार कौशल्य कसे विकसित करता येईल या बाबतीत आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी.ए.सुर्यवंशी यांनी देखील रोजगार कौशल्य निर्मिती व्हावी अशा पद्धतीने अभ्यासक्रम पूर्नरचना करावी, असे आवाहन सहभागी प्राध्यापकांना केले.
यावेळी कार्यशाळेसाठी सह-समन्वयक म्हणून डॉ पी.एन सौदागर यांनी काम केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. के.डी.गायकवाड यांनी केले तर आभार डॉ. जितेंद्र पाटील यांनी मानले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी लाईफ सायन्सेस विभागातील शिक्षक स.प्रा वृषाली सोनगीरे, स.प्रा व्हि.के.पटेल, शिक्षकेतर कर्मचारी लॅब असिस्टंट महेंद्र क्षीरसागर, प्रतिभा पाटील ,रविंद्र पाटील, योगेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.