वाळवणी पदार्थ करण्यासाठी महिलांची लगभग सुरू. ग्रीष्म ऋतूतील महिलाचा घरगुती उद्योग जोमात…

वाळवणी पदार्थ करण्यासाठी महिलांची लगभग सुरू

ग्रीष्म ऋतूतील महिलाचा घरगुती उद्योग जोमात…

जळगाव प्रतिनिधी-: अरे संसार संसार ,,,, या बहिनाबाईच्या कविते प्रमाणे महिलांना घरात काय हवय काय नको ? याची नेहमी चिंता असते . म्हणूनच सध्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघडू सहपरिसरात महिलांची वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी लगभग सुरू झाली आहे .
महाराष्ट्रात पुर्वी शेती मशागतीतुन उसंत मिळताच व पुढे लग्न कार्य आसल्यास किंवा हातचे पदार्थ म्हणून गव्हापासून शेवया , कुरर्डया ,बाजरी पासून खारोड्या,वडे, ज्वारी पासून पापड , तांदळापासून पापड , चकल्या,उडीदापासुन वडे ,पापड, मुंगाचीदाळ मुंगवडया , बटाट्या पासून चिप्स , चकल्या ,शाबुदाना चिप्स , चकल्या आदि वाळवणाचे पदार्थ वर्ष भर घरात वेग वेगळ्या वेळी किंवा सणावारा सह उपवासासाठी तळून वापरले जातात . हा वाणेाळा प्रत्येक घरात असावेत हया साठी महिलांची धडपड असते . पुर्वी सर्व खरीप _ रब्बी पिके घरात काढून आणल्यानंतर ग्रिष्मरुतु मध्ये शेती मशागत कामे थांबताच महिला या उन्हाळी वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी कामाला लागतात . हा उदयोग एकटी – दुकटीला जड वाटत असल्याने ऐक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ,,, या उक्ती प्रमाणे हेळून मेळून शेजार पाजारनी एकत्र येऊन हा उद्योग सुरू होतो . शहरात यंत्र उद्योग उपलब्ध व बाजारात तयार मिळत असल्याने आणि आता यंत्र बचत गटांच्या समुह उदयोगातुन उपलब्ध होत असल्याने विकत घेतात परंतु ग्रामिण भागात महिला घरीच तयार करत असतात . आता शेवया तयार करण्याचे यंत्र आले असून त्यामुळे रोजगार तयार झाला आहे . तर काही महिला रोजंदारी वर मदत करत असल्याने त्यांना रोजगार मिळाला आहे पूर्वी शेवया फळी पाटावर केल्या जात असत त्याची चव व पध्दत वेगळीच होती .