दिव्यांग शिक्षक राजू जाधव यांचा तिरंगा रक्षक पुरस्काराने सन्मान

दिव्यांग शिक्षक राजू जाधव यांचा तिरंगा रक्षक पुरस्काराने सन्मान

तिरंगा रक्षक ने केलेला सन्मान हा माझ्यासाठी अभिमानाचा
राजू जाधव यांचे गौरवोद्गार

शिराळा :शिराळा तालुक्यातील इंगरुळ गावातील दिव्यांग शिक्षक राजू जाधव यांचा तिरंगा रक्षक गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
तिरंगा रक्षक वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक वर्षी तिरंगा रक्षक समाज गौरव पुरस्काराने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मंडळींचा सन्मान केला जातो. सन 2021 या सालातील समाज गौरव पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार वितरण करताना शिराळा तालुक्यातील मंगरूळ गावातील दिव्यांग शिक्षकांचा सामाजिक योगदान पाहून त्यांना घोषित करण्यात आला होता. त्याचे वितरण इंग्रूळ तालुका शिराळा येथील समाज मंदिरामध्ये शानदार कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी तिरंगा रक्षक चे संपादक विश्वास मोहिते, चंद्रकांत जाधव,बाबासाहेब कांबळे यांची उपस्थिती होती.
यावेळी सत्काराला उत्तर देताना राजू जाधव म्हणाले आजवर माझे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असताना आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना बऱ्याच ठिकाणी सत्कार आणि सन्मान झाले परंतु तिरंगा रक्षक या वर्तमानपत्राच्या माध्यमातून 14 व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या जन्मभूमी मध्ये येऊन केलेला माझा सन्मान हा माझ्यासाठी अभिमानाचा आहे यापुढे असेच सामाजिक उपक्रमात मी सक्रिय राहील तर तिरंगा लक्ष्याची ही सामाजिक बांधिलकी अशीच तेवत ठेवावी अशी अपेक्षाही राजू जाधव यांनी व्यक्त केली.