खडकदेवला-लोहटार जिल्हा परिषद गटात आणखी एका नवीन लोकप्रिय चेहरा’ची सध्या सर्वत्र जास्त चर्चा सुरू

खडकदेवला-लोहटार जिल्हा परिषद गटात आणखी एका नवीन लोकप्रिय चेहरा’ची सध्या सर्वत्र जास्त चर्चा सुरू

श्री अनिलभाऊ सावंत सर,गाळण बु आगामी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीसाठी नाव परीसरात जास्त चर्चेला

पाचोरा तालुक्यातील व शहरातील युवा नेतृत्व तसेच समाजशील परखड नेतृत्व म्हणून ओळख

असंख्य मित्र परीवारांचा परीवार असल्याने त्यांनी केलेल्या जनसेवेनंतर तसेच समाजसेवेनंतर त्यांनी यंदा या निवडणुकीत उभे राहावे होत आहे सर्वत्र अशा चर्चा खडकदेवला-लोहटार गटात व विशेष खडकदेवला गणात रंगत आहे ?

खडकदेवला-लोहटार जिल्हा परिषद निवडणुक किंवा खडकदेवला गणातुन पंचायत समिती निवडणुकीसाठी त्यांना उभे केले जाण्याची दाट शक्यता आहे ? असे त्यांचे काही मित्र परीवार यांचे मत व्यक्त होत आहे.

श्री अनिलभाऊ सावंत सर यांचा संपर्क खडकदेवला-लोहटार गटातील प्रत्येक गावात जास्त आहे.त्यांचे कार्य व मनमिळाऊ स्वभावामुळे सर्वजण त्यांच्याशी परिचीत आहे.

सुरूवातीपासुन समाजसेवा त्याचबरोबर राजकिय, सामाजिक,पत्रकारिता, सहकार,शैक्षणिक या क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे हा गुण त्यांचे व त्यांचे कुटुंबियांत असल्याने तालुक्यातील चर्चेत व सर्वात जास्त लोकप्रिय चेहरा सर्वांच्या समोर आहे.

सद्यस्थितीत ते वसतिगृह अधीक्षक म्हणून त्रंबकनगर,कृष्णापुरी पाचोरा येथे कार्यरत असून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हासंघटक त्याचप्रमाणे दादासो गजमल को-ऑप बँक येथे संचालक व ऍक्टिव्ह पोलीस टाईम्स न्युज चे पत्रकार म्हणून कार्य करीत असून गेल्या 25 वर्षांपासून ग्रामपंचायत गाळण बु च्या निवडणुकीत त्यांचा सहभाग राहून मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे ते माजी सदस्य ग्रामपंचायत गाळण बु सुद्धा राहून गेले आहेत सदैव गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी हजर राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती आहे

प्रत्येक क्षेत्रातील त्यांचा फार मोठा गाढा अभ्यास असून ते निवडणुकीत उभे राहिल्यास गटातील किंवा गणातील नागरिकांचा निश्चितच फायदा होणार हे मात्र नक्कीच

गाळण बु त्यांचे मुळगाव असुन परीसरात आतापासुन त्यांच्या मित्र परीवाराची मागणी व चर्चा सुरू झाली आहे.

ते कोणत्या पक्षातुन उमेदवारी घेतात ? किंवा अपक्ष लढतात ? हे आगामी काळात त्यांच्या भुमिकेनंतर व निर्णयानंतर सर्वांना कळणार आहे.

पण एवढेच नक्की आहे- खडकदेवला-लोहटार जिल्हा परिषद गटाला व विशेष खडकदेवला गणाला एक नवीन चेहरा मतदारांना मिळणार आहे.