अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी महाराजांचा जय जिजाऊ जय शिवराय ,छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घोषणा देत जयजयकार करण्यात आला.
या नंतर उपस्थित पाचोरा नगरपालिका आरोग्य निरीक्षक धनराज पाटील,अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे कृषी समिती प्रमुख डॉ.एन.आर.पाटील ,आरोग्य समिती प्रमुख डॉ.मुकेश नैनाव ,शिक्षण समिती प्रमुख श्री सुधाकर पाटील ,सहकार समिती प्रमुख श्री आर बी ठाकरे ,संघटक श्री.शरद गीते,सहसंघटक डॉ.प्रशांत सांगळे, कोषाध्यक्ष डॉ.कुणाल पाटील,मराठा समाजाचे सामाजिक कार्यकरते व कराठे असोसिएशन चे राजेंद्र पाटील ,मराठा संघटनेचे श्री.रवी पाटील ,श्री.गजानन पाटील व बालशिवाजी च्या वेशभूषेत चि.सुशांत या सर्वांनी महाराजांना पुष्पहार व पुष्प वर्षाव करण्यात आला.
या प्रसंगी डॉ.अनिल देशमुख यांनी शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासातील प्रसंगाचे दाखले देत नगर पालिका व शासन व सर्व सेवा भावी संघटना यांनी सर्व परिसराचे अतिशय सुंदर सुशोभीकरण केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद व्यक्त केलेत.