नागपूर विधानसभेवर नियोजित मोर्चा दि.२३ डिसेंबर रोजी

जळगाव परिमंडळ द्वार सभा संपन्न

नागपूर विधानसभेवर नियोजित मोर्चा दि.२३ डिसेंबर रोजी

महाराष्ट्र राज्य वीज
कर्मचारी,अधिकारी,अभियंता संघर्ष समिती.
तिसरा टप्पा
दि.१६/१२/२०२२
************************
महाराष्ट्राच्या वीज उद्योगाचे खाजगीकरण-अदानी कंपनी मार्फतच्या धोरणाविरुद्ध वीज कंपनीतील, कामगार, कर्मचारी,अधिकारी,अभियंते यांच्या संयुक्त कृती समितीचे वतीने निषेध नोंदविण्यासाठी सर्व संघटनांच्या सभासद पदाधिकारी यांनी सोमवार दिनांक १६ डिसेंबर २०२२ रोजी सर्व महाराष्ट्र भर द्वार सभा घ्याव्यात असे ठरले होते
त्यानुसार आज
जळगाव परिमंडळ मधील जळगाव, धुळे ,नंदुरबार सर्कल मधील सर्व संघटनांच्या सभासद पदाधिकारी यांनी आपल्या प्रत्येक विभागीय कार्यालय, समोर द्वार सभा घेऊन सक्रिय सहभाग नोंदविला आणि प्रचंड स्वरूपात विरोध नोंदविला आहे .

जळगाव विभाग व शहरातील सर्व कार्यालये अंतर्गत कार्यरत सर्व सहभागी संघटनांचे सभासद पदाधिकारी यांनी

संध्याकाळी 06.00.वाजता परिमंडळ कार्यालय
समोर द्वारसभा घेऊन अदानी, राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध करण्याकरिता ग्राहक,बाह्यस्त्रोत्र कर्मचारी,कायम कर्मचारी,अधिकारी, अभियंते यांनी सर्व कामे बाजूला ठेवून बहुसंख्येने उपस्थित राहून द्वार सभा घेऊन सक्रिय सहभाग घेऊन निषेध नोंदवला आहे.
सदर द्वार सभेत संघर्ष समिती सदस्य संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
मागील म्हणजे दुसरा टप्प्यात लोकप्रतिनिधी, आमदार खासदार मंत्री, तहसीलदार, जिल्हाधिकारी , पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य आणि ईतर पदाधिकारी यांना कृती समितीचे वतीने निवेदन देऊन त्यांचे मार्फत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उर्जा मंत्री यांना सादर करण्याचे बाबतीत विनंती करण्यात आली आहे.
*महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन* संघटनेचे वतीने *कॉ.विरेंद्रसिंग पाटील*परिमंडळ सचिव यांनी सभेला संबोधित केले.संघटनेचेवतीने ** परिमंडळ सचिव,*कॉ.दिनेश बडगुजर* सर्कल अध्यक्ष जळगाव,कॉ.प्रकाश कोळी सर्कल सेक्रेटरी जळगाव,कॉ.भगवान सपकाळे माजी सर्कल अध्यक्ष जळगाव,कॉ.प्रभाकर महाजन विभागीय अध्यक्ष जळगाव,कॉ.किशोर जगताप विभागीय सचिव जळगाव,कॉ.हेमंत बारी,कॉ.शरद बारी,कॉ.देवेंद्र भालेराव,कॉ.सचिन फड,कॉ.गणेश बाविस्कर,कॉ.महेश बिचवे,कॉ.किरण सपकाळे, कॉ.सचिन फड,कॉ.विक्रांत देसले,कॉ.निलेश भोसले,कॉ.गिरीष बर्हाटे ,कॉ.ज्ञानेश्वर पाटील,कॉ.मंगेश बोरसे,कॉ.कमलाकर काकडे,कॉ.गणेश शेंडे,कॉ.हेमंत राठोड,कॉ.मनोज जिचकार,कॉ.विशाल न्हाळदे,कॉ.राम मोहन रॉय जळगाव उपस्थित होते.
ईतर संघटना चे पदाधिकारी सबॉर्डीनेट इंजिनीअर्स असो.श्री.पराग चौधरी, श्री विशाल खंडारे, श्री कुंदन भंगाळे, स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटना श्री.एस के लोखंडे,
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना चे श्री.आर आर सावकारे,
वीज कामगार महासंघ चे श्री.मोहन गारूंगे ,श्री ज्ञानेश्वर पाटील,
बहुजन वीज कामगार कर्मचारी अभियंता फोरम चे श्री.विजय सोनवणे, श्री.नितीन रामकुंवर
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन चे श्री.आर आर पाटील, श्री.रविंद्र ठाकूर, श्री.संजीव बारी,
बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेचे श्री.सुलेमान तडवी,
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेचे श्री.मधुसूदन सामुद्रे,

जळगाव परिमंडळ अंतर्गत नंदुरबार धुळे, सावदा, भुसावळ, पाचोरा, मुक्ताई नगर, चाळीसगाव, धरणगाव येथे उत्स्फूर्त पणे निषेध द्वार सभा संपन्न झाल्या.
जळगाव परिमंडळ अंतर्गत कार्यरत कर्मचारी अधिकारी अभियंता संयुक्त संघर्ष समिती तर्फे २००० सदस्य दि.२३डिसेंबर २०२२ रोजी च्या नागपूर विधानसभेवर नियोजित निषेध मोर्चा मध्ये सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला.
नंदुरबार येथे कॉ.विजय सुर्यवंशी
धुळे येथे कॉ.नाना पाटील,कॉ.पराग नाईक,कॉ.सुधीर पाटील,
चाळीसगाव येथे कॉ.जे.एन.बाविस्कर ,कॉ.नितीन पाटील, कॉ.विशाल पाटील
सावदा येथे कॉ.जितेंद्र अस्वार,अस्लम मण्यार, अजय सपकाळे
पाचोरा येथे कॉ.शरद मोरे,कॉ.विशाल पाटील,के.डी.पाटील , धर्मराज पाटील, वाल्मिक पाटील, जगदीश महाजन, अविनाश राठोड,
धरणगाव येथे कॉ.मनोज देवराळे
मुक्ताई नगर येथे कॉ.गोकुळ सोनवणे,कॉ.सुनिल सोनवणे
भुसावळ येथे कॉ.देविदास सपकाळे, आशिष जोशी कॉ.रविंद्र गायकवाड यांनी प्रतिनिधित्व केले.
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी,अधिकारी,अभियंता संघर्ष समिती.जळगाव परिमंडळ