जिल्हास्तरीय सिनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा पाचोरा येथे उत्साहात संपन्न 

जिल्हास्तरीय सिनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा पाचोरा येथे उत्साहात संपन्न

जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व पाचोरा तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सिनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा पाचोरा येथील एम एम महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेचे उदघाटन पाचोरा तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी कुस्तीचे प्रशिक्षक आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार्थी सुनिल पाटील यांनी मैदानाचे पूजन करून व श्रीफळ वाढवून केले केले याप्रसंगी जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव, उपाध्यक्ष डॉ विजय पाटील, प्रा हाजी ईकबाल मिर्झा, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष गिरीश पाटील, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पंच समितीचे अध्यक्ष प्रा वसीम मिर्झा यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी खेळाडूंना स्पर्धेविषयी मार्गदर्शन केले. निवड समिती सदस्य म्हणून राहुल साळुंखे (चाळीसगाव), प्रा गिरीश पाटील (पाचोरा), सचिन सुर्यवंशी (धरणगाव), डॉ सचिन भोसले (भडगाव) यांनी काम पाहिले स्पर्धेत पंच म्हणून प्रा हरिश शेळके, सचिन महाजन, गिरीश महाजन, देवानंद पाटील, जितेंद्र शिंदे (सर्व जळगाव), ममता शर्मा (भुसावळ) संदीप पवार (पारोळा), प्रेमचंद चौधरी (भडगाव), देविदास महाजन (चोपडा), गणेश पाटील, वाल्मिक पाटील, सुभाष राठोड, सुशांत जाधव (सर्व पाचोरा) यांनी तर स्पर्धा प्रमुख म्हणून डॉ विजय पाटील तर स्पर्धा आयोजन सचिव म्हणून प्रा गिरीश पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पाचोरा तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले. जिल्हा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील विजयी स्पर्धक राज्य ॲथलेटिक्स सिनियर स्पर्धेसाठी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. सूत्रसंचालन पाचोरा तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे गणेश पाटील यांनी तर उपस्थितांचे स्वागत व आभार प्रदर्शन पाचोरा तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव प्रा गिरीश पाटील यांनी केले स्पर्धेत जिल्ह्यातील असंख्य पुरुष व महिला स्पर्धक सहभागी झाले होते.