नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे भडगावात स्वच्छता अभियान उपक्रम संपन्न

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे भडगावात स्वच्छता अभियान उपक्रम संपन्न…!!!!!

भडगाव (लोक प्रतिनिधी) – डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा,ता.अलिबाग (रायगड) यांच्या सौजन्याने डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिनांक १ मार्च २०२३ बुधवार रोजी भडगाव शहरात विविध परिसरात स्वच्छता अभियान प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांच्या मोठ्या उत्साहाने पार पडले.
सदर अभियानांतर्गत संपूर्ण भडगाव शहरात तसेच परिसरातील जवळपास २५ कि.मी.परिक्षेत्रात ४५८ श्रीसदस्यांनी मिळून सकाळी ७ ते ११ या वेळेत ओला व सुका कचरा मिळून एकूण २३ टन कचरा जमा करुन त्याची योग्य त्याठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली.
यावेळी त्यांना नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले.