पाचोऱ्यात रोटरी क्लब यांच्या सौजन्याने श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप व वृक्षारोपण

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु. भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पाचोरा येथे आज रोटरी क्लब पाचोरा यांच्या सौजन्याने गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नानासो.व्ही.टी.जोशी होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, ज्येष्ठ संचालक भाईसो. दुष्यंतजी रावळ, रोटरी क्लबचे अध्यक्ष दादासो डॉ.अमोल जाधव,सचिव आबासो.डॉ. गोरख महाजन,शाळेचे समन्वयक जिभूसो.एस.डी. पाटील सर,प्रोजेक्ट हेड श्री. रावसाहेब पाटील उपस्थित होते. प्रथमत: माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.शाळेच्या आवारात बहुपयोगी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष तथा संस्थेचे म. अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले. म.अध्यक्षांनी संस्थेच्या वतीने क्लबचे आभार मानत रोटरी क्लब विषयी गौरवोद्गार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमास रोटरी क्लबचे ज्येष्ठ रोटेरियन सर्वश्री चंद्रकांत लोढाया,राजेश मोर,डॉ.अजय सिंग परदेशी,डॉ.स्वप्नील पाटील, डॉ.विशाल पाटील, डॉ.पवन सिंग पाटील,अतुल शिरसमणे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक परदेशी सर,शिक्षक वृंद पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. मुख्याध्यापक यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती.वर्षा पाटील मॅडम यांनी तर आभार श्री. दीपक पाटील सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.