आदिवासी कोळी महासंघ(संघर्ष समिती) ची भडगाव तालुका उपाध्यक्ष व विधानक्षेत्र प्रमुख भडगाव तालुका पदाचे नियुक्ती पत्र हे पाचोरा-भडगाव तालुक्याचे कार्य सम्राट आमदारांच्या व संघटनेच्या पदाधिकारी च्या हस्ते देण्यात आले

आदिवासी कोळी महासंघ(संघर्ष समिती) ची भडगाव तालुका उपाध्यक्ष व विधानक्षेत्र प्रमुख भडगाव तालुका पदाचे नियुक्ती पत्र हे पाचोरा-भडगाव तालुक्याचे कार्य सम्राट आमदारांच्या व संघटनेच्या पदाधिकारी च्या हस्ते देण्यात आले

पाचोरा प्रतिनिधी

आदिवासी कोळी महासंघ (संघर्ष समिती )आदरणीय मा.मंत्री महोदय दशरथजी भांडे यांच्या हस्ते पदे जळगाव येथे काही दिवसापूर्वी वाटप करण्यात आली होती. व सर्व जळगाव जिल्हा ची कार्यकारिणी जाहीर झाली होती.तर काही तालुक्याचे पदे रिक्त होती. संघटनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय श्री.संभाजीदादा शेवरे यांच्या हस्ते तालुक्याचे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची नियुक्ती करण्यात आली. तसेच भडगाव तालुका उपाध्यक्ष पद हे रिक्त होते.
१५ /७/२०२३ रोजी रविवार रोजी पाचोरा भडगावचे सर्व समाज बांधव व आदिवासी कोळी महासंघ (संघर्ष समिती) या संघटनेच्या पदाधिकारी यांचे हस्ते नागपुर पावसाळी अधिवेशनात पाचोरा भडगाव चे कार्य सम्राट आदरणीय मा.किशोर आप्पा पाटील यांना कोळी समाजाच्या जातीच्या दाखल्यासाठी निवेदन देण्यात आले.
शुभ प्रसंगीआमदारांच्या हस्ते व संघटनेचे उपाध्यक्ष संभाजी शेवरे दादा तसेच सर्व पदाधिकारी ,_सर्व समाजाच्या हस्ते भडगाव तालुका उपाध्यक्ष पदी श्री.अनिल सावळे(भडगाव) तसेच भडगाव तालुका विधान क्षेत्र प्रमुख पदी माजी तहसिलदार श्री.आत्माराम जाधव यांची नियुक्ती करण्यात नियुक्ती पत्र देण्यात आली. याप्रसंगी राजेंद्र मोरे सर,दशरथ आण्णा जाधव,समाजाचे जेष्ठ आदरणीय श्री. पि.के. आण्णा सोनवणे,आदरणीय श्री महाले गुरुजी सर्व समाज बांधव उपस्थित होते.व सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या