पाचोरा- भडगाव ग्राहक सेवा संघाच्या सरचिटणीसपदी आनंद नवगिरे यांची निवड

पाचोरा- भडगाव ग्राहक सेवा संघाच्या सरचिटणीसपदी आनंद नवगिरे यांची निवड

पाचोरा(वार्ताहर) दि,२
पाचोरा येथील ग्राहक सेवा संघ, पाचोरा- भडगाव या स्वयंसेवी, सेवाभावी, ग्राहकांच्या हितासाठी आणि ग्राहकांच्या प्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या संस्थेची बैठक नुकतीच हुतात्मा स्मारक येथे अँड. मनिषा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्राचार्य डी. एफ. पाटील यांनी वाढते वय आणि प्रकृतीच्या कारणामुळे संस्थेच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आनंद नवगिरे यांची सरचिटणीस पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली. पदभार स्विकारल्या नंतर आनंद नवगिरे यांचा विनोदराय मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच याप्रसंगी जळगाव कवयत्री बहिणा – बाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी निवडून आल्याबद्दल नानासाहेब व्ही. टी. जोशी यांचा प्रा.एल.बी. शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर दिल्ली एन.सी.आरची ‘डाक्टरेट (पीएचडी)’मिळाल्या बद्दल योगेश पाटील यांचा आर.पी. बागूल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सभाध्यक्ष अॅड. मनिषा पवार, प्राचार्य डी. एफ. पाटील, नानासाहेब व्ही. टी. जोशी- आनंद नवगिरे, योगेश पाटील यांची समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन अशोक महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन गोपाल पटवारी यांनी केले.
सभेस राधेशाम दायमा, शेख खलील शेख बुरा, कैलास अहिरे, एकनाथ संदनशीव, पत्रकार अनिल येवले, संजय गोसावी, अरविंद जगताप, अशोक मोरे, रविंद्र सोनवणे, सुमेध नवगिरे, मृणाल नवगिरे, शेख जावेद, दिलीप बागूल राकेश सावंत, उज्वला महाजन, डॉ. अर्चना पाटील, लता शर्मा, राधा शर्मा, दुर्गा मोरे, अनघा नवगिरे, माला पंजाबी, विद्या कोतकर, कविता महाजन, सौ कुर्हाडकर, आदि उपस्थित होते.