पशुसंवर्धन दिनाचे औचित्य साधत पशूपूजन करून वाढदिवस केला साजरा

पशुसंवर्धन दिनाचे औचित्य साधत पशूपूजन करून वाढदिवस केला साजरा

गोराडखेडा येथील चि. शौर्यचा वाढदिवस दि.२० रोजी सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. पशुसंवर्धन विभागाचा वर्धापन दिवस २० मे रोजी साजरा करण्यात येतो. याच दिवशी गोराडखेडा येथील रहिवासी जिल्हा बँकेचे निवृत्त शाखा अधिकारी रामदास आनंदा पाटील यांचा नातू व दै. देशदूतचे पत्रकार, ग्रामपंचायत सदस्य तथा नवजीवन विद्यालयाचे उपशिक्षण मनोज रमदास पाटील यांचा मुलगा शौर्याचा वाढदिवस पशुपूजन करून साजरा करण्यात आला. ग्रामीण भागाचा कणा शेती व पशुपालन आहे. मानवी जीवनासाठी उपयुक्त गोष्टींचा लाभ पशुंपासून नेहमीच घेतला जात असतो. या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे संवर्धन व निगा याविषयी पशुवैद्यकीय विभागामार्फत जनजागृती व विविध उपक्रम राबवत २० मे हा दिवस पशुसंवर्धन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. चि सूर्याचा वाढदिवस २० मे रोजी असल्याने पशुसंवर्धन दिनाच्या औचित्य साधत गोमाता व वासराचे पूजन करण्यात आले.
वाढदिवस साजरा करते वेळी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत अनाठाईही खर्च करण्यात येतो. तसेच वाढदिवस करत साजरा करते वेळी अनेक चुकीच्या परंपरांचा प्रसारही झपाट्याने होत आहे. या सर्व गोष्टींना छेद देत गोराडखेडा येथील पाटील परिवाराने पशुपूजन करून प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत आदर्श वाढदिवस साजरा केला. त्यामुळे बालगोपाळांच्या मनात लहानपणापासूनच पशु व प्राण्यांविषयी दया व प्रेमभाव निर्माण होण्यास मदत होईल. पाटील परिवारातर्फे पशुपूजन करून साजरा करण्यात आलेला वाढदिवस आदर्श असून पशुधन मालक, पशुप्रेमी व सुज्ञ नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.