आपली बूथरचना भक्कम करा असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले

आपली बूथरचना भक्कम करा असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले

 

पाचोरा(वार्ताहर)दि१८
कार्यकर्त्यानी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा !
आपली बूथरचना भक्कम करा असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले. ते पाचोरा आयोजीत शिवदूत, बुथप्रमुख,शाखा प्रमुख विभाग
प्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. शहरातील सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स मध्ये हा मेळावा पार पडला.
—————
येथे शिवसेना शिवदूत, बुथप्रमुख,शाखा प्रमुख विभाग
प्रमुखांचा बाजार समीतीच्या आवारात मेळावा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य पदमसिंग पाटील, उपजिल्हाप्रमुख तथा बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, तालुकाप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर,बंडू चौधरी, युवासेनेचे तालुकाप्रमुख योगेश पाटील डाॅ.भरत पाटील,माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे,कृष्णा मुळे, मंगेश काळकर आदी उपस्थित होते.

आमदार किशोर पाटील म्हणाले की,
काका सर्वांचेच चांगले होते पण कोणाला भाऊ तर कोणाला बहीण नडत असल्याचे सांगत त्यांनी स्वतःसह राज्यातील मुंडे बंधू भगिनी, पवार बंधू भगिनी व ठाकरे बंधूंमधील वादाचे उदाहरण दिले.यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला होता.पुढे बोलतांना ते म्हणाले की,
वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आम्ही गेलो.जनतेने माझा हा निर्णय मान्य करत बाजार समिती व शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिले. मतदार संघातील जनतेचे कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद गटनिहाय जनसेवा कार्यालय उघडविण्यात आले. त्या माध्यमातून जनतेपर्यंत शासानाच्या योजना पोहचविण्याचे काम सुरू आहे. ते पुढे म्हणाले की, आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागणे आवश्यक आहे.यासाठी
आपली बुथ रचना प्रत्येकांने भक्कम करणे गरजेचे आहे. या वर्षभरात मतदार संघात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. ती कामे कार्यकर्त्यानी जनतेपर्यंत पोहचवायला हवीत असे आवाहन केले.
यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील,उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील,तालुका प्रमुख सुनील पाटील, शरद पाटे यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. प्रवीण ब्राह्मणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आभार मानले.
एमआयडीसीच्या भूमीपूजनाच्या घोषणा
आगामी २६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नगरदेवळा येथील नियोजित एम आय डी सी चे भूमीपूजन करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा यावेळी आमदार किशोर अप्पा पाटिल यांनी केली.