एम. एम. महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन

एम. एम. महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन

*पाचोरा दि. 19 -* पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजयजी वाघ यांच्या शुभहस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक व श्री. गो. से. हायस्कूलचे चेअरमन मा. श्री. दादासाहेब खलीलजी देशमुख, मा. श्री. शशिकांत चंदिले, प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. जी. बी. पाटील, पर्यवेक्षक मा. प्रा. एस. एस. पाटील, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. के. एस. इंगळे यांनी केले.