स्वच्छता हीच खरी सेवा अभियाना अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे स्वच्छता अभियान अतिउत्साहात संपन्न

स्वच्छता हीच खरी सेवा अभियाना अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे स्वच्छता अभियान अतिउत्साहात पार पाडण्यात आले

आयुष्य भव: या सरकारच्या उपक्रमा अंतर्गत आज दिनांक १ आक्टोबर २०२३ ला महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सकाळी १० वाजता पासून तर १२ वाजेपर्यंत हे स्वच्छाता अभियान राबविण्यात आले.हे अभियान डॉ .प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित राहुन पार पाडण्यात आले.यासाठी डॉ खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ शेख, डॉ.झाकिया, डॉ बोरकर,सौ वंदना विनोद बरडे सह.अधीसेविका श्रीमती तुलसी कुमरे परिसेविका, श्रीमती सरस्वति कापटे परिसेविका, श्रीमती रुबिना खान अधिपरिचारीका, श्री प्रतापसींग राजपूत, श्री सतिस येडे, सौ अनिता ठाकरे,सौ वर्षा भुसे,श्री अमोल भोग, घोटकर,विजय ऊके, निरंजना कोरडे, कुंदा मडावी, लक्ष्मीकांत ताले,सोनू देवगडे, रंगनाथ सोरडे, श्री जवादे सागर कापटे,समीर ऊके श्री मेश्राम सेक्युरिटी गार्ड इत्यादींनी साफसफाई व स्वच्छता अभियानात मेहनत घेतली.सर्वांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला व स्वच्छता अभियानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.आणी स्वच्छतेचा संदेशासोबत प्रचार व प्रसार करण्यात आला.