क्रिएटिव्ह स्कूल ला घे भरारी बालकलाविष्कार जल्लोषात साजरा

क्रिएटिव्ह स्कूल ला घे भरारी बालकलाविष्कार जल्लोषात साजरा

नांद्रा ता. पाचोरा (वार्ताहर )- येथील क्रिएटिव्ह स्कूलचा बालकलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम घे भरारी 2023 कार्यक्रम उत्साहात साजरा झाला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर नृत्य विविध राज्यातील कला, हास्य नाटक याबरोबरच सामाजिक संदेश देणारे व राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारे नाटक व राष्ट्रीय एकात्मता देणारे विविध राज्यातील कलाविष्कार सादर करून विविधतेतून एकता निर्माण करणारे बोलकी चित्रे डोळ्यासमोर उभे करून सर्व पालक वर्गसह परिसरातील शिक्षण प्रेमी, ग्रामस्थांचे व पालक वर्गाचे मने जिंकली याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन मारवड उपसरपंच व मारवड पाटील सायन्स कॉलेजचे अध्यक्ष भिकनराव भालेराव पाटील यांनी केले तर विशेष अतिथी पाचोरा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उपस्थिती दिली व ग्रामीण भागातील अतिशय नियोजनबद्ध सादरीकरण बद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षक स्टॉप कौतुक व अभिनंदन केले ,याप्रसंगी सरपंच ताई आशाताई भिकन तावडे, उपसरपंच शिवाजी तावडे,ग्रामपंचायत सदस्य योगेश भाऊ सूर्यवंशी, बंटी भाऊ सूर्यवंशी, भाऊसाहेब बाविस्कर, सुभाष तावडे,पोलीस पाटील किरण तावडे,तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष बाविस्कर,सामाजिक कार्यकर्ते बापू सर सूर्यवंशी,विनोद आप्पा बाविस्कर, पंकजसर बाविस्कर,,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वप्निल बाविस्कर, किरण भाऊ सोनार,गणेश सूर्यवंशी, पत्रकार राजेंद्र पाटील, हेमंत पाटील,नंदू बागुल आसनखेडा पालक प्रतिनिधी संदीप पाटील, दगडू दोधू पाटील,बांबरुड भूषण सोळंके, सामनेर प्रशांत चौधरी, शिवाजी भाऊ साळुंखे, कुरंगी दिनकर पाटील माहिजी पालक प्रतिनिधी मुनीर शेख, पहान पालक प्रतिनिधी ईश्वर पाटील,नांद्रा पालक प्रतिनिधी सम्राट नाना तुकाराम सोनवणे, कुरंगी किरण मोरे,गजानन ठाकूर सर,ओम भाऊ पवार,नामदेव पाटील, नवल पाटील, संदीप खैरनार गजानन पंडित बाविस्कर,आनंदा जाधव,सुरेश शामराव अनिल बोरसे, महेश गवादे, दिलीप गुरुजी सह मोठ्या संख्येने शिक्षणप्रेमी पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुंधती राजेंद्र व गजानन ठाकूर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. यशवंत पवार यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वी साठी नम्रता पवार,वैशाली पाटील,पुनम सोनवणे, पूजा काळे, सोनल गोसावी, अनुराधा पाटील,मनीषा पाटील,पूजा धोबी, सुभाष पिंपळे यांनी परिश्रम घेतले.