_गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात गुरुपोर्णिमेनिमीत्त कार्यक्रम संपन्न

_गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात गुरुपोर्णिमेनिमीत्त कार्यक्रम संपन्न….!!!!!_

कोळगाव (भडगाव)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे गुरुपोर्णिमेनिमीत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंवतीने सुंदर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गुरुप्रति निष्ठा व्यक्त करण्यासाठी इयत्ता बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आजचा हा अविस्मरणीय कार्यक्रम घडवून आणला,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी प्राचार्य नरेंद्र भोसले,कार्यवाहक रघुनाथ पाटील,प्रा.माया मराठे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे दिवंगत संस्थापक चेअरमन तात्यासाहेब,देवी सरस्वती,सर्वपल्ली राधाक्रिष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन तथा अभिवादन करण्यात आले.
तद्नंतर विद्यार्थ्यांंकडून शाळेस छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा प्राचार्य तथा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेट म्हणून देण्यात आली.
विद्यार्थ्यांंमधून चि.सुमीत पाटील याने गुरुप्रती आदर व्यक्त करणारे मनोगत व्यक्त करीत उपस्थितांची दाद मिळवली,कार्यवाहक रघुनाथ पाटील यांनीही गुरुचे स्थान आजच्या जीवनातही किती मोलाचे आहे,हे पटवून दिले.
अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य सुनिल पाटील यांनी महाभारत तथा रामायणातील विविध दाखले देऊन गुरुप्रती निष्ठा ठेऊन वाटचाल करण्याचे आवाहन केले,तसेच आळस झटकून मेहनतीने फळ मिळवण्याचे आवाहन आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.प्रणाली शिंपी तर आभार कु.कोमल पाटील हिने मानले,कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य नरेंद्र भोसले,कनिष्ठ महाविद्यालयीन कार्यवाहक रघुनाथ पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.