जिल्हाधिकारी अमन मित्तल २८ जुन रोजी पाचोऱ्यात

जिल्हाधिकारी अमन मित्तल २८ जुन रोजी पाचोऱ्यात

पाचोरा, प्रतिनिधी जिल्हाधिकारी अमन मित्तल हे २८ जुन रोजी पाचोरा दौऱ्यावर येत असून उपविभागीय अधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांची बैठक, दुपारी १२:३० वाजता नागरिकांच्या भेटी, त्यांच्या समस्यांबाबत निवेदन स्वीकारणे व त्या संदर्भात चर्चा करणे, दुपारी १:३० वाजता तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया प्रतिनिधींची प्रशासकीय विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. याप्रसंगी तालुक्यातील नागरिकांनी, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया प्रसार माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशानुसार पाचोरा तहसिलदार प्रविण चव्हाणके यांनी केले आहे.