बंधुत्व व शांततेसाठी नगरदेवळा मुस्लिम समाजाचा ऐतिहासिक निर्णय

बंधुत्व व शांततेसाठी नगरदेवळा मुस्लिम समाजाचा ऐतिहासिक निर्णय

पाचोरा ( प्रतिनिधी )
आपण दररोज देशात बंधुत्व व शांतता निर्माण करणारी उदाहरणे पाहतात पण या दिशेने नगरदेवळा मुस्लिम समाजाने अनोखे पाऊल उचललेले आहे. आगामी बकरी ईद चा सण असल्याने व महाराष्ट्र शासनाने कुर्बानीची तीन दिवस परवानगी दिलेली असूनही मुस्लिम बांधवांनी गावातील इतर धर्माच्या बांधवांचे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करण्याच्या निर्णय घेतला आहे.सदर निर्णय स्व इच्ळेने घेतला आहे. नगरदेवळा गावाचे मुस्लिम भाई आषाढी एकादशीचे दोन दिवस कुर्बानी करणार नाही. मुस्लिम समाजाचे या पाऊल मुळे आपले परिसरा मध्ये आपसी बंधुत्व व भाईचारा वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. यावेळी नगरदेवळा गावाचे प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवक गणी सेठ, नूर चेअरमन, सादिक बागवान, ग्रामपंचायत सदस्य वसीम शेख, गरीब नवाज फाउंडेशनचे अध्यक्ष अफरोज शेख व इतर मान्यवर उपस्थित होते. परिसरात अशा निर्णयामुळे हिंदू मुस्लिम बंधुभाव जोपासला जात आहे.सर्वत्र निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.