श्री.गो.से.हायस्कुल येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

श्री.गो.से.हायस्कुल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

पाचोरा (प्रतिनिधी)
पा. ता. सह. शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कुल, पाचोरा येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.आज पासून सुरु झालेल्या या वर्गात विद्यार्थ्यांनी परीक्षेत सुयश मिळविण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम. वाघ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी पर्यवेक्षक .आर.एल. पाटील, .ए.बी.अहिरे यांच्या मार्गदर्शनाने या वर्गास प्रारंभ झाला.
शालांत परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना अभ्यास, सराव, पेपर लेखन पद्धती, वेळेचे नियोजन, भीतीमुक्त परीक्षा इत्यादी संबंधी मार्गदर्शन शाळेतील तज्ञ विषय शिक्षक करीत आहेत.
आज मार्गदर्शन वर्गाच्या पहिल्या दिवशी मराठी विषयाचे मार्गदर्शन . डी. डी. कुमावत, . एम. आर. पाटील यांनी तर संस्कृत विषयाचे मार्गदर्शन . बी. एस. पाटील तर हिंदी विषयाचे मार्गदर्शन .आर. बी. तडवी यांनी केले.
दि.12 जानेवारी ते 14 जानेवारी अशा तीन दिवस चालणाऱ्या या वर्गात विविध विषयांचे तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.