सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज नवीन शैक्षणिक वर्ष सन- 2023/24  उत्साहात सुरुवात

सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज नवीन शैक्षणिक वर्ष सन- 2023/24  उत्साहात सुरुवात

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज नवीन शैक्षणिक वर्ष सन- 2023/24 च्या प्रथम दिवशी “प्रवेशोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय इमारतीत रांगोळ्या काढून,फुगे लावण्यात आले होते.विद्यार्थ्यांचे औक्षण करून,गुलाब पुष्प,शालेय पाठ्यपुस्तके व गोड खाऊ देऊन ढोल-ताशांच्या गजरात शाळेत स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती चेअरमन बापूसाहेब जगदीश पंडितराव सोनार,शाळेचे मुख्याध्यापक श्री‌.अशोक परदेशी सर,पालक प्रतिनिधी व समस्त शिक्षक वृंद उपस्थित होता.