अवैध वाळू उपसा विरोधात डोकलखेडा येथील ग्रामस्थांचा विरोध

अवैध वाळू उपसा विरोधात डोकलखेडा येथील ग्रामस्थांचा विरोध

नांद्रा (ता.पाचोरा)ता.८ डोकलखेडा येथील जुन्या गावठाण भागातील गावठाण हद्दीतून माती व दहीगाव धरणाच्या विस्तारलेल्या अथांग पाण्यातुन प्लास्टीक टाक्यांच्या सहाय्याने बनवलेल्या ताट्यांच्या मदतीने पाण्यातुन ताट्यांवर साठवून स्थानिकांच्या मदतीने वाळू साठवणूक करून नंतर अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने येथील सरपंच योगेश पाटील, उपसरपंच सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील, अनिल भिल्ल ग्रामसेवक एस.आर.पाटील यांच्या सह स्थानिक ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायतची मासिक सभा आटोपून थेट गिरणा काठावर जाऊन प्रत्यक्ष उत्खनन सुरू असलेल्या भागात पहाणी केली.या बाबतीत सरपंच योगेश पाटील यांनी पाचोरा प्रांत अधिकारी डॉ विक्रम बांदल यांच्या कडे या अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याने यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली असता.प्रांत अधिकारी श्री डॉ.बांदल यांनी घटनास्थळी नांद्रा मंडळाधिकारी प्रशांत पगार,तलाठी नदीम शेख (दहिगाव ) दीपक दवंगे ( माहिजी कुरंगी) , आशिष काकडे , श्री आगरकर यांच्या सह पथक पाठवले.तो पर्यंत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून काठावर बांधून ठेवलेले ताट्यांना पाण्याच्या मध्यभागी सोडून दिले होते.म्हणून ताट्यांना पाण्यातुन काढता येत नव्हते. शेवटी स्थानिकांच्या मदतीने ताटे पाण्याच्या बाहेर काढून पाण्याच्या टाक्या पाचोरा ये महसूल विभागात जमा करण्यात आले . बांबू व इतर साहित्य जाळून टाकले. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,मंडळाधिकारी यांच्या मदतीने रस्त्ता जे.सी.बी.च्या सहाय्याने चारी खोदून रस्ता बंद करण्यात आला.यावेळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
गिरणा काठावर मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा व रस्त्याची होणारी चाळन या बाबतीत वारंवार तक्रारी येत होत्या.त्यावरुण आज प्रत्यक्ष पहाणी केली.व महसूल विभागाने कार्यवाही केली आहे.या पुढेही कोणतीही अवैध वाळू उपसा होणार नाही याची खबरदारी घेऊ.
योगेश पाटील सरपंच पती डोकलखेडा.