गो.पु.पाटील महाविद्यालयाची कु.पायल पाटील विभागस्तरीय कुस्तीत उपविजयी

_गो.पु.पाटील महाविद्यालयाची कु.पायल पाटील विभागस्तरीय कुस्तीत उपविजयी..!!!!_

*भडगाव (प्रतिनिधी) -* कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यावय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील इयत्ता बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थीनी तथा पैलवान कु.पायल पाटील हिने १९ वर्षाआतील मुलींच्या ५५ किलो वजनी गटात क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,तर्फे आयोजीत विभागस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले.
कु.पायलला आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,प्रा.सतीश पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
पायलच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,उपसचिव प्रशांतराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत पाटील,माध्यमिक सोसायटी संचालक जगदीश पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.