वर्गमित्रांची एकत्र भेटीतून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा 

वर्गमित्रांची एकत्र भेटीतून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशांना फाटा देत — प्रत्यक्ष भेटीतून सण साजरा

 

सोयगाव प्रतिनिधी

आजच्या डिजिटल युगात सणांच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरून शुभेच्छा देण्याचे प्रमाण वाढले असून, पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष भेटून सण साजरा करण्याची परंपरा लोप पावत चालली आहे. ही हरवलेली उब पुन्हा अनुभवण्यासाठी आदर्श कलाशिक्षक संजय जोहरे आणि सन १९९१ च्या बॅचचे वर्गमित्र यांनी यंदाची दिवाळी काहीशी वेगळ्या पद्धतीने साजरी केली.

 

या सर्वांनी व्हॉट्सअ‍ॅपवर शुभेच्छा न देता, प्रत्यक्ष भेटीतून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. जुन्या मित्रांच्या भेटीत हास्य-विनोद, आठवणींचा ओघ, आणि मैत्रीचा गोडवा नव्याने अनुभवायला मिळाला.

 

या आनंददायी भेटीत विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर वर्गमित्र उपस्थित होते. त्यात स्वामी समर्थ पतसंस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर (बाळू) पाटील (बोरसे), डॉ. ज्ञानेंद्र पायघन, गोपाल दुसाने, रघुनाथ काटोले सर, गोकुळ रोकडे, कृषिभूषण अरुण सोहनी, दीपक देशमुख, अशोक पाटील, सुभाष सोहनी, सुनिल कळवत्रे, विजय वामने, कैलास आगे, श्रीप्रसाद इंगळे, प्रफुल्ल महानोर, समाधान चौधरी, रवींद्र बाविस्कर आणि मुरलीधर बागले यांचा समावेश होता.

 

मैत्रीचा बंध अधिक दृढ करण्याच्या या उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. पुढील काळात अशा भेटींचा नियमित उपक्रम सुरू ठेवण्याचा संकल्पही यावेळी वर्गमित्रांनि केला.