नवजीवन विद्यालय पाचोरा येथे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस साजरा

नवजीवन विद्यालय पाचोरा येथे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस साजरा

२२ डिसेंबर हा दिवस भारतीय थोर गणितशास्त्रज्ञ श्रीनिवास रामानुजन अय्यंगर यांचा जन्मदिवस असून तो राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा होत असतो. त्यानिमित्ताने नवजीवन विद्यालय पाचोरा येथे श्रीनिवास रामानुजन यांच्याविषयी माहिती सांगून व गणित विषयातील विविध रंजक उदाहरणे सोडवून, सांख्यिकी जादुई चौकोन कसा तयार करावा व त्यातील गणितशास्त्र, त्यासोबतच संख्यांची बेरीज याविषयी माहिती सांगत विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण करण्यात आले. याविषयी विद्यालयातील गणित व विज्ञान विषयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री आर वाय चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करत गणित विषयातील विविध उदाहरणे देत त्यांच्यातील रंजकता विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिली.
विद्यार्थ्यांच्या मनात गणिताविषयी भीती असल्याचे बहुतांश विद्यार्थी गणित विषयाला घाबरत असल्याचे विद्यार्थ्यांकडून प्रकर्षांने जाणवते मात्र गणित हा विषय आवडीने शिकल्यास तो अतिशय रंजक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गणित विषयातील ही रंजकता समजून गणिताविषयी आवड निर्माण करावी अशा प्रकारची सुचना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस बी पवार सर यांनी या निमित्ताने विद्यार्थ्यांना केली.