पाचोरा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मा. जिल्हाधिकारी चे बरोबर अनोख्या पद्धतीने केला जागतिक ग्राहक दिन साजरा…!

पाचोरा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मा जिल्हाधिकारी चे बरोबर अनोख्या पद्धतीने केला जागतिक ग्राहक दिन साजरा
आज 15 मार्च जागतिक ग्राहक दीना निमित्य covid19 च्या पार्शवभूमीवर महाराष्ट्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक आदेशा चे तंतोतंत पालन करीत नेहमी जल्लोषात साजरा होणारा जागतिक ग्राहक दिन आज मा श्री अभिजित राऊत जिल्ल्हाधिकारी जळगाव यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत अखिल भारतीय ग्राहक पंचायत पाचोरा येथील सन्मानीय पदाधिकारी डॉ अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष ,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब चिंधु मोकळं ,संघटक शरद गीते ,जिल्हा आरोग्य समिती प्रमुख डॉ मुकेश तेली ,सहसंघटक डॉ प्रशांत सांगळे ,शैक्षणिक समिती प्रमुख भानुदास साळूखे माजी संचालक ग स सोसायटी ,माजी केंद्र प्रमुख सुधाकर पाटील ,डॉ दीपक चौधरी श्री आर बी ठाकरे सर आदी सन्मानीय सदस्य पाचोरा यांनी म जिल्ल्हाधिकारी जळगाव यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात उपस्तीती नोंदवत जिल्हास्तहरिय शासकीय अफहिकाऱ्यांचे मनोगत जाणून घेतले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म जिल्ल्हाधिकारी अभिजित राऊत होते तर प्रमुख उपस्तीती श्रीजाधव अन्न व औषध विभाग प्रमुख ,तसेच वजन मापे विभाग प्रमुख बेडनगले साहेब हजर होते
कार्यक्रमात उपस्तीती वर उल्लेखित मान्य वर यांनी अन्न औषधी भेसळ,व वजन मापे यावर ग्राहकाची फसवणूक कशी टाळता येईल व ग्राहकाने कशी सावधानता बाळगावी ह्या विषयी मार्गदर्शन केलेत
जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सूर्यवंशी साहेब यांनी ग्राहक कायदा 1986 व आता अमलात आलेला 2019 चा ग्राहक कायदा यातील फरक व ह्या कायद्यान्वये ग्राहकास फार मोठे अधिकार प्राप्त झाले असून 1कोटी पर्यंतच्या तक्रारींचे निवारण जिल्हा ग्राहक आयोगाच्या कक्षेत असून त्यावर विशिष्ट मुदतीत ग्राहकास तात्काळ न्याय मिळणेसाठी सुसह्य झाले आहे व ह्या कायद्या अंतर्गत फसवणूक करणाऱ्यास किती व कशी कठोर शिक्षा होईल त्या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
म जिल्ल्हाधिकारी जळगाव यांनी ग्राहकांचे फसवणूक होऊ नये म्हणून कसे जागृत रहावे व या विषयी कार्य करणाऱ्या ग्राहक संघटना व ग्राहक याना योग्य ते सर्व सहकार्य जिल्ल्हाधिकारी व इतर सर्व विभागांकडून सर्वतोपरी देण्यात येईल असे अभिवचन दिले
शेवटी जिल्ल्हाधिकारी यांचे मार्फत उपस्तीत सर्व शासकीय ,निम शासकीय सदस्य ,अखिल भारतीय ग्राहक पंचायत व इतर उपस्तीत ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी यांचे आभार मानण्यात आले.
सदरच्या कार्यक्रमास पाचोरा येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्ह्यात सर्वात जास्त संख्येने उपस्तीती नोंदवली व ग्राहक संरक्षणासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत नेहमीच जागरूक व तत्पर असल्याचे नेहमी प्रमाणे सिद्ध केले आहे .
पाचोऱ्या नंतर अमळनेर तालुक्यातीलही अध्यक्ष भारती अग्रवाल ,माजी अध्यक्ष व जिल्हा सहसंघटक मकसूद बोहरी,सौ स्मिता चंद्रात्रे, वनश्रीताई अमृतकर आदी सन्मानीय सदस्य तर धरणगाव चे तालुका अध्यक्ष श्री विनायक महाजन व जिल्ह्यातील इतर तालुक्यातील सन्मानीय सदस्य व पदाधिकारी अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी बहुसंख्येने आपली लक्षणीय उपस्तीती नोंदवत जागतिक ग्राहक दिन म जिल्ल्हाधिकारी अभिजित राऊत ,जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सूर्यवंशी व इतर सर्व शासकीय निमशासकीय सदस्य यांचे समवेत आधुनिक विज्ञानाची कास धरत ऑनलाईन मोठ्या जल्लोषात साजरा केला.
या निमित्य डॉ अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी जिल्ह्यतील सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन करीत आभारही मानले आहेत .
डॉ अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष जळगाव
अखिल भारतीय ग्राहक पंचायत