बांबरुड महादेवाचे नदीपात्रात गिरणामाईचा मानसन्मान,नदी – स्वच्छता अभियान

पाचोरा श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे बांबरुड महादेवाचे नदीपात्रात गिरणामाईचा मानसन्मान,नदी – स्वच्छता अभियान

पाचोरा श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या पर्यावरण प्रकृती विभागातर्फ
पाचोरा, बांबरुड महादेवाचे, बांबरुड( भडगाव तालुक्यातील), पिंपळगाव थडीचे या नदीकाठच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकरी यांनी सामुदायिक विपुल पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी पाचोरा सह अनेक गावाची जीवनदायी गिरणा नदीचा मानसन्मान, सामुदायिक प्रार्थना, जलाशय नदी स्वच्छ ठेवण्यासाठी व घाण होऊ न देणे व घाण दिसल्यास ती साफ करू अशी सामुदायिक प्रतिज्ञा करण्यात आली.
गिरणामाईच्या चरणी रुजू केल्यानंतर जवळपास 100 ते 150 सेवेकऱ्यांनी नदीपात्रात्तील सर्व घाण एकत्रित करून काही घाण जाळून तर काही घाण गड्डा करून टाकली.
अभियान यशस्वी होण्यासाठी श्री. सुभाषदादा पाटील, ,श्री. मनीष बाविस्कर सर,श्री सुवर्णसिंग राजपूतसर श्री अंबालाल पवार सर , श्री सुधीर महाजन सर, सौ. रेखाताई पाटील,श्री. गजेंद्र चौधरी सर, श्री. वाल्मीक भाऊ पाटील(बांबरुड महादेवाचे) श्री. सचिनभाऊ पाटील(थडीचे पिंपळगाव) ,श्री. तुषार पाटील(बांबरुड बुद्रुक), श्री. जुगल राठोड सर ,श्री .किरण वाणी ,श्री. अभिषेक नेरकर, श्री राहुल बाउचे सर, हर्षल चित्ते, प्रफुल्ल राजपूत, श्री नंदू भाऊ वाणी, श्री. चंद्रकांत पाटील , सुधीर पाटील, कल्पेश पाटील, सागर पाटील (बांबरुड महादेवाचे) रवींद्र पाटील (पिंपळगाव थडीचे) संगीताताई पाटील ,दिपालीताई भोसले, शेंडगेताई, मीराताई निकम यांनी परिश्रम घेतल.