चोपडा महाविद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोन आधारित वस्तुनिष्ठ परीक्षेचे आयोजन

चोपडा महाविद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोन आधारित वस्तुनिष्ठ परीक्षेचे आयोजन

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विभागातर्फे ‘राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने ‘वैज्ञानिक दृष्टीकोन शोध परीक्षेचे’ (Scientific Attitude Search Examination) आयोजन करण्यात आले होते. या ‘वैज्ञानिक दृष्टीकोन शोध परीक्षेचे’ उदघाटन वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. एम. बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विभागातील डॉ.पी.एन. सौदागर व डॉ. जे. जी. पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी सदिच्छा भेट दिली.
विद्यार्थ्यामध्ये शास्त्रीय दृष्टीकोन विकसित होण्याच्या दृष्टीने वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. एम. बागुल यांनी विद्यार्थ्यांना माहितीपर मार्गदर्शन केले. ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ हा सर सी. व्ही. रमन याच्या ‘रमण इफेक्ट’ या विषयी संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल माहिती दिली. त्यासोबतच त्यांनी स्पर्धापरीक्षेमध्ये विज्ञानाच्या प्रश्नांचे महत्व आणि पदवी स्तरावर त्यांची तयारी करण्याच्या दृष्टीने सराव व्हावा या करिता सदर परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
यावेळी डॉ. पी. एन. सौदागर यांनी परीक्षेच्या नियम व अटी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर परीक्षा दिनांक २८/०२/२०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये एकूण ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यात वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान इ विषयातील प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष बी.एस्सी. वर्गाचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
या परीक्षेत पहिला क्रमांक वैष्णवी निवृत्ती पाटील (प्रथम वर्ष बीएस्सी.) हिने मिळविला. जागृती गुलाब वाडे हीने दुसरा क्रमांक प्राप्त केला. तसेच तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक अनुक्रमे श्रुती हिरामण वाडे, जयश्री संजय विसावे, भुवनेश्वरी भारत पाटील या विद्यार्थीनीनी प्राप्त केला.
या परीक्षेसाठी परीक्षक म्हणून डॉ. पी. एन. सौदागर व डॉ. जे. जी. पाटील यांनी काम पहिले. याप्रसंगी विभागाच्या वतीने आर. व्ही. पाटील यांनी परीक्षेच्या कामात परिश्रम घेतले.