नांद्रा येथील आशा सेविका पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित

नांद्रा येथील आशा सेविका पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित

नांद्रा (ता.पाचोरा)ता.३१ येथील ग्रामपंचायत सचिवालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन सरपंच सिमाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या परीपत्रकानुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार हा येथील आशा सेविका सौ.सुनिता पाटील व आशा सेविका प्रतिभा सोनवणे या आशा सेविकांचा साडी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कोरोणा काळात आशा सेविकांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा जवखेडा येथील मुख्याध्यापक पंकज बाविस्कर यांनी आपल्या मनोगतात मांडला यावेळी सरपंच सिमाताई पाटील, उपसरपंच शिवाजी तावडे, ग्रामपंचायत सदस्य निर्मला पिंपळे, भाऊसाहेब बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते अमोल सूर्यवंशी, ग्रामसेविका अनिता सपकाळे मॅडम, आशा सेविका सुनिता पाटील, प्रतिभा सोनवणे, दिपाली पाटील, कर्मचारी दिलीप तावडे, संजय पाटील, पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या सह अंगणवाडी मदतनीस सुनंदा पाटील, आशाबाई खरे,बेबाबाई पाटील, संगिता सोनवणे उपस्थित होते.