पीजे बचाव कृती समिती यांची नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट

पीजे बचाव कृती समिती यांची नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे व खासदार श्री उमेश पाटील रक्षा खडसे यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पीजेरेल्वे सुरू करण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न झाली पाचोरा ते जाम+नेर अशी 54 किलोमीटरची रेल्वे कोवोड पासून बंद आहे ही गोरगरिबांची सर्वसामान्यांची विद्यार्थी शेतमजूर व व्यापारी यांची अत्यंत महत्त्वाची जीवनवाहिनी असलेली डीजे रेल्वे मागील दोन वर्षापासून बंद आहे सुरू करण्यासंदर्भात पाचोरा येथे पीजे बचाव कृती समिती यांच्या मार्फत सुरू करण्यासाठी पाचोरा जामनेर पहूर शेंदुर्णी भगदरा वरखेडी पिंपळगाव या ठिकाणी एकाच वेळी धरणे आंदोलन स्वाक्षरी मोहीम यासारखे आंदोलन करण्यात आली त्यानंतर डी आर एम भुसावळ तसेच जीएम यांना त्यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देऊन पेजेस सुरू होण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर जळगाव लोकसभेचे खासदार श्री उमेश दादा पाटील यांच्या पुढाकाराने त्यांनी कृती समितीला दिल्ली येथे बोलून रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व रेल्वेमंत्री यांच्याशी कृती समितीची रेल भवन रेल्वे मंत्रालय येथे बैठक सुमारे 1तास चालली कृती समितीने सांगितले की पीजी सुरू झालीच पाहिजे रेल्वेचे अधिकारी यांनी काही तांत्रिक अडचण निर्माण करून नकारात्मकता दाखवली खासदार उमेश पाटील व कृती समिती यांनी पाचोरा ते जामनेर ब्रॉडगेज करावी त्या अगोदर आहे त्या स्थितित ती सुरू करावी त्या अगोदर किती सुरु करावी मंत्री रावसाहेब दानवे यांनी डीआरएम केडिया यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना विचारणा केली की पीजेसुरू करण्यासाठी काय केले पाहिजे त्यांनी सांगितले की पीजेसुरू करण्यासाठी 24 कोटी खर्च येईल व त्यासाठी 10 ते 11 महिने लागतील दानवे साहेब यानी सांगितलं आम्ही त्याची व्यवस्था करतो पैशाची चिंता करु नका पीजे सुरू करण्यासाठी जे जे काही लागेल त्यासाठी तयारी करावी अशी सकारात्मकता दाखवली या अगोदर खासदार उमेश पाटील रक्षा खडसे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले त्यानंतर रेल्वेमंत्री रेल्वे अधिकारी चर्चा केली आणि त्यानंतर जे टेक्निकल बाबी असतील त्या दुरुस्त करून गाडी सुरू करण्यासाठी जे काही करता येईल ते ते साहित्य उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली यानंतर ची बैठक भुसावळ येथे डीआरएम वरिष्ठ अधिकारी कृती समिती समिती पदाधिकारी व दोन्ही खासदार यांच्या उपस्थित होणार आहे कृती समितीने सांगितले पीजे सुरू झाली नाही तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करणार डी आर एम जीएम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या यांच्याशी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे हे सविस्तर बैठक घेऊन तिचे सुरू करण्यासंदर्भात पुढचे पाऊल उचलणार आहेत कृती समितीने जे आंदोलन केले व हा विषय दिल्लीपर्यंत नेला त्याबद्दल कृती समितीचे रावसाहेब दानवे व खासदार उमेश पाटील यांनी कौतुक केले पीजे सुरू करणे व बोदवड पर्यंत नेने यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव असून तो त्वरित मान्यतेसाठी पाठवण्यात येत आहे व त्यासाठी डीपीआर तयार करून त्यावर लागणारा निधी हा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले यावेळी रेल्वेचे एक्झिक्युटिव्ह मॅनेजर संजय देशपांडे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या चर्चेत कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख कार्याध्यक्ष एडवोकेट अविनाश भालेराव पप्पू राजपूत प्राध्यापक गणेश पाटील प्राध्याप मनीष बाविस्कर, राजेन्द्र पंडित पाटील ,संजय जडे,रणजीत पाटील आरिफ शेख पहूर हे उपस्थित होते गाडी सुरू होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत त्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी हे कामाला लागले आहेत