श्रीमती ज्योती चौधरी यांना ‘विद्यावाचस्पती’ पदवी प्रदान

श्रीमती ज्योती चौधरी यांना ‘विद्यावाचस्पती’ पदवी प्रदान

पाचोरा दि. 10 -पहूर येथील आर. टी. लेले हायस्कूलच्या शिक्षिका श्रीमती ज्योती फकीरा चौधरी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून ‘द. ता. भोसले यांच्या साहित्यातील ग्रामीण जीवन दर्शन’ (मराठी) या विषयासाठी ‘विद्यावाचस्पती’ (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांना मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांनीही सहकार्य केले. त्यांनी याआधी आपले एम.ए.एम.एड.चे शिक्षण पूर्ण करून जानेवारी 2019 मध्ये सेट आणि जून 2019 मध्ये नेट या पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या. त्यांचा संस्थेचे चेअरमन मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन, सचिव डॉ. अनिकेत लेले, व्हा. चेअरमन श्री. साहेबराव देशमुख, मुख्याध्यापक श्री. आर. बी. पाटील, पर्यवेक्षक श्री. एस. व्ही. पाटील, श्री. किशोरदादा पाटील, श्री. राजधरभाऊ पांढरे, डॉ. एल. एम. चौधरी, श्री. रवींद्र चौधरी व संस्था परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.