हाताला काम आणि हृदयात राम हेच आमचे हिंदुत्व

हाताला काम आणि हृदयात राम हेच आमचे हिंदुत्व

 

आज भोकरी या गावात युवा सेनेतर्फे गाव तिथे शाखा व गाव तिथे युवा सैनिक या अभियाना अंतर्गत मुस्लिम बहुल वस्तीत पाचोरा भडगाव मतदार संघाच्या शिवसेना नेत्या सौ वैशाली ताई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना कोरोना काळात कोणत्याही जातीभेद न ठेवता गोरगरिबांचे प्राण वाचविले आणि हिंदुत्वाची व्याख्या म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम या तत्त्वाने जनतेची सेवा केली असे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभले पण आपल्याच गद्दारांनी त्यांच्या पाठीमागे वार करून त्यांना पायउतार केले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना सर्व धर्माची मने त्यांनी जिंकली कोरोना काळात शेतकऱ्यांना मालाला योग्य भाव दिला सर्व धर्म समभाव हा संदेश दिला कोणाचेही मन दुखावले नाही म्हणून आज मुस्लिम समाज पूर्ण ताकदीने संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे त्याच उदाहरण म्हणजे आज आपल्या भोकरी गावात माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व मुस्लिम बांधव मित्रांनो आज स्वर्गीय तात्यासाहेब आर ओ पाटील यांची कन्या व या तालुक्याची लेक सौ वैशालीताई सूर्यवंशी या खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आल्या आहेत ताईंनी गेल्या सात महिन्यात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम पाचोरा भडगाव मतदार संघात राबविले आहे त्याच प्रामुख्याने पाचोरा भडगाव मतदार संघ मोतीबिंदू मुक्त व्हावा या निर्धाराने जवळपास सातशे रुग्णांचे ऑपरेशन करून त्यांना दृष्टी देण्याचे काम ताईंनी केल आहे ताईंकडे कोणत्याही प्रकारचे पद नाही सत्ता नाही पण गोरगरिबांसाठी काम करण्याचा जो निर्धार त्यांनी केला आहे
त्यांच्याकडे बघून स्वर्गीय तात्यासाहेब आरोप पाटील यांची आठवण प्रत्येकाला होते मतदारसंघात अपंग बांधवांना सायकलीचे वाटपअसो किंवा रक्त चाचणी शिबिराचे आयोजन वैशालीताई यांनी भविष्यात पाचोरा भडगाव मतदार संघात बेरोजगारी शेतकरी बांधवांचे हिताचे निर्णय व जनतेचे आरोग्यावर काम करण्याचा ताईंचा मानस आहे आणि त्याच माध्यमातून गेल्या सात महिन्यापासून कार्य सुरू आहे माझ्या पाचोरा भडगाव मतदार संघात माझा तरुण वर्ग हा देश सेवेसाठी जर पोलीस भरती किंवा सैन्य भरतीत जाण्यास इच्छुक असेल तर सौ वैशालीताई सूर्यवंशी यांनी पाचोरा येथील नवीन निर्मल स्कूल मध्ये अभ्यास पुस्तिका उपलब्ध करून एक मदतीचा हात दिला आहे पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व युवकांना नम्र विनंती करतो की तुम्ही याचा लाभ घ्यावा मित्रांनो येणारा जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आपण सर्वजण दीपक भाऊ राजपूत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्या हक्काच्या माणसाला निवडून आणा आणि पाचोरा भडगाव मतदार संघात भावी आमदार सौ वैशालीताई सूर्यवंशी यांचे हात बळकट करा पाचोरा भडगाव मतदारसंघ भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहावे एक सुसंस्कृत नेतृत्व एक अभ्यासू नेतृत्व आपणास लाभणार आहे खूप छोटे छोटे प्रश्न जनतेची असतात मी ज्या ज्या ठिकाणी बैठकी घेतो आहोत त्या त्या ठिकाणी लोकांना रेशन कार्डच्या समस्या असो आरोग्याच्या समस्या असो या छोट्या छोट्या तक्रारी लोकांच्या मी बघितले आहेत लोकांना खूप काही मोठी अपेक्षा नाही पण त्यांची काम करण्याची मानसिकता कोणाचीच राहिली नाही म्हणून आज पाचोरा भडगाव मतदार संघाची जनता सौ वैशालीताई सूर्यवंशी यांच्या पाठीशी उभी आहे याप्रसंगी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप जैन उपतालुकाप्रमुख शशी भाऊ पाटील एडवोकेट गौरव दादा पाटील व समाजातील सर्व मुस्लिम बांधव व युवासैनिक बांधव उपस्थित होते