ग्रामसेवकाने केला पंच्चावन लाखाचा अपहार;सरपंच व उपसरपंचानी गटविकास अधिकारी यांच्या केडे केली तक्रार

ग्रामसेवकाने केला पंच्चावन लाखाचा अपहार;सरपंच व उपसरपंचानी गटविकास अधिकारी यांच्या केडे केली तक्रार

चोपडा प्रतिनिधी : चोपडा तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत उमर्टी येथील ग्रामसेवक वासुदेव पारधी यांनी पेसा निधी हडप केलेली तारीख ३१ सप्टेंबर २०२२ते ३१ मार्च २०२३ पर्यंत तसेच १४ वित्त,१५ वित्त आयोग,मानव विकास योजना अश्या विविध निधीतून एकून ५५ लाख रुपयांचा घोटाळा केलेला आढळून आला यात परस्पर खाते वापर करणे,बाहेरून ग्रामपंचायत हाताळणे,चुकीचे बिल बनविणे,बनावट सह्याचा वापर करुन निधी हडप करणे,ग्रामपंचायत चे संपुर्ण दफ्तर घरी बसून गैरवापर करणे,अश्या प्रकारचे पराक्रम करुन भ्रष्टाचार केलेला आढळून आला आहे.यावेळी लोकनियुक्त सरपंच रीनेश पावरा यांनी खंत व्यक्त केली खूप मोठा भोंगळ कारभार वासुदेव पारधी यांनी केलेला आहे.परस्पर सर्व ग्रामपंचायत च्या खात्यांचे मालक बनणे,गावागावात एकमेकांचे भांडण लावणे,एकमेकांविरूद्ध भडकावून शांतता भंग करणे,तसेच गटविकास अधिकारी ही या प्रकरणावर वारंवार दुर्लक्ष करत आहे.व अशा ग्रामसेवकांना पाठीशी घालत आहेत.सर्व मिलीभगत असून आर्थिक व्यवहारात ग्रामसेवकाला पाठीशी घातले जात आहे.व याबाबतीत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी असे आपले म्हणणे सर्व गावकऱ्यांसमोर व शौर्य स्वाभिमानचे प्रतिनिधी यांच्यासमोर सरपंच यांनी व्यक्त केले यावेळी उपसरपंच संदीप सांगोरे यांनी एकूण निधीचा हिशोब वाचून दाखविला प्रोसेडिंग बुक कोरी पडलेली होती कोणतेच काम कायदेशिर केलेले आढळून आलें नाही यावेळी एकून ग्रामपंचायत सदस्य हजर राहून याविरुद्ध आवाज उठविला तसेच गावातली जास्तीत जास्त ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित राहिले व शासन परिपञक क्रमाक व्हीपीएम – २०१३ /प्र.क्र.१३७/पंरा.३ दि.१२ जुन २०१३ या परिपञकानुसार ग्रामपंचायतीत आर्थिक व्यवहारात करने व मालमत्ता आथवा निधीचा अपहार करणे तसेच उमर्टी ग्रामपंचायतील मुळ दस्ताऐवज खोट्या बनावट कागदपञाचा समावेश करणे या गुन्ह्यास जबाबदार असणाऱ्या ग्रामसेवक विरुद्ध फौजदारी गुन्हा तात्काळ दाखल यावा व जो गावाचा विकासासाठी शासनाकडुन मिळालेला निधी देखील सदर ग्रामसेवकाकडुन वसुल करण्यात यावा असेही त्यांचे म्हणणे स्पष्ट केले.