थाई बॉक्सिंग स्पर्धेत भडगावच्या १८ खेळाडूना यश

थाई बॉक्सिंग स्पर्धेत भडगावच्या १८ खेळाडूना यश

थाई बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व लातूर जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित थाई बॉक्सिंग ऑफ महाराष्ट्र स्पर्धा लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडली या स्पर्धेत २० जिल्हा ३०० थाई बॉक्सिंग खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत भडगांव तालुक्यातील १८ खेळाडूंनी यश मिळविले.

यात आर्यन सोनवने स्वर्ण पदक, कार्तिक महाजन स्वर्ण पदक, जयेश पाटिल स्वर्ण पदक, प्रेम देवरे स्वर्ण पदक, , अविनाश शिंदे स्वर्ण पदक, शोएब सादिक खातीब स्वर्ण पदक, निशांत पाटील स्वर्ण पदक, दुर्गेश पाटील स्वर्ण पदक, कृष्णा बोरसे स्वर्ण पदक, शाहरुख मन्यार स्वर्ण पदक, मानसी पाटील स्वर्ण पदक, भावना परदेशी स्वर्ण पदक , प्रांजल गोसावी स्वर्ण पदक, दर्शन पाटील रौप्य पदक, विपुल साळुंखे रौप्य पदक, गौरव पाटील रौप्य पदक, उदय पाटील रौप्य पदक, पियुष खैरनार रौप्य पदक, खान अयान अतिक यांनी पंच म्हणून काम पाहिले . खेळाडूना जळगांव जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन भडगांव जिल्हा अध्यक्ष हाजी जाकिर कुरेशी, उपाध्यक्ष श्याम पाटिल व इतर संस्था पदाधिकारी डॉ. वसीम मिर्झा, सौरभ पाटिल, संतोष पाटिल, सौरभ देशमुख, अजगर खान व अबुजर खान राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक अबरार खान यांचे मार्गदर्शन लाभले गुवाहटी आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा करिता निवड झालेल्या सर्वच खेळाडूंचे कौतक करण्यात आले.