पाचोऱ्यात रावण दहन उत्साहात संपन्न

पाचोऱ्यात रावण दहन उत्साहात संपन्न

पाचोरा ( प्रतिनिधी ) शहरातील कोरोना काळात बंद झालेली रावण आणि कुंभकर्ण दहणाचा कार्यक्रमाची प्रथा आज पुन्हा सुरू झाली.

पाचोरा शहरातील सिंधी नवजवान युवक आयोजित सिंधी कॉलनी परिसरात दशेरा मैदानावर रावण दहण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सुरुवातीला फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सुरवातीला पी एस आय श्री कणगे यांनी कुंभकर्ण यांच्या हस्ते दहण करण्यात आले तर रावण दहन कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली यावेळी शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, डॉ. वैभव सुर्यवंशी आदी उपस्थित होते. सिंधी बांधवांनी उत्तम नियोजन केले होते. या कार्यक्रमाला शहरातील अलोट गर्दी उसळली होती. सिंहावलोकन करुन नागरिक घरी गेले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता