Home महाराष्ट्र सोयगावात संतांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा; आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात संत समाज आक्रमक

सोयगावात संतांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा; आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात संत समाज आक्रमक

सोयगावात संतांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा; आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात संत समाज आक्रमक

 

 

सोयगाव, दि. 23 एप्रिल 2026 (प्रतिनिधी) – तालुक्यातील सोयगाव येथे सनातन हिंदू धर्मातील पूजनीय संतांविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी संत समाज, वारकरी संप्रदाय तसेच सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने एकवटला. विकास लवांडे यांच्या विरोधात संतप्त जनसमुदायाने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन सादर केले.

मोर्चादरम्यान आंदोलकांनी संतांविषयी करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असले, तरी संबंधित व्यक्तीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. सुधन्वा जी महाराज केनेकर यांनी केले. यावेळी ह.भ.प. निवृत्ती महाराज मोहने, ह.भ.प. जितेंद्र महाराज पंडित, ह.भ.प. गोपाल महाराज पवार, ह.भ.प. कुमारी जान्हवी दीदी सोनवणे तसेच ह.भ.प. पारस महाराज जैन यांनी आपल्या मनोगतातून संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. संतांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोर्चात परिसरातील वारकरी बांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ह.भ.प. निलेश महाराज राजपूत, ह.भ.प. शरद महाराज पवार, ह.भ.प. किरण महाराज यांच्यासह विविध सामाजिक घटकांनी एकजूट दाखवत निषेध व्यक्त केला.

तहसील कार्यालयात निवेदन सादर करत संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या घटनेमुळे सोयगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून सामाजिक व धार्मिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Don`t copy text!