पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

जळगाव ( प्रतिनिधी ) = पाचोरा शहरात तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थित शिवसेना कार्यालयात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस फुलहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय गोहील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत,शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारावकर, तालुका प्रमुख शरद पाटील, माजी नगरसेवक महेश सोमवंशी, डॉ. भरत पाटील, रहेमान तडवी, बंडु चौधरी, गंगाराम पाटील,
प्रा. गणेश पाटील, नाना वाघ, राजु पाटील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.