Home महाराष्ट्र मुख्याध्यापक सुनील वानखेडे सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात

मुख्याध्यापक सुनील वानखेडे सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात

मुख्याध्यापक सुनील वानखेडे सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात

 

 

पारध (प्रतिनिधी-महेंद्र बेराड)

 

भोकरदन तालुक्यातील पारध येथील जनता विद्यालय व महाविद्यालयात मुख्याध्यापक सुनील वानखेडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारध पोलीस स्टेशनचे एपीआय संतोष माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक अजय ठाकूर, अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव उदयसिंह लोखंडे तसेच जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शर्मिला शिंदे (लोखंडे) उपस्थित होत्या.

 

यावेळी प्रा. संग्राम राजे देशमुख यांनी आपल्या भाषणातून सुनील वानखेडे यांच्या कार्यशैलीचा गौरव करत त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील मोलाच्या योगदानावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला.

 

उदयसिंह लोखंडे यांनी मनोगतात सांगितले की, सुनील वानखेडे यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सेवानिवृत्तीनंतरही ते आर्थिक पतसंस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

सुनील वानखेडे हे जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वालसावंगी येथून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले असून, ते अजिंठा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.

 

कार्यक्रमाच्या शेवटी जनता विद्यालयाच्या वतीने सुनील वानखेडे यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.

 

यावेळी ज्ञानेश्वर लोखंडे, दिलीप लोखंडे, अमोल श्रीवास्तव, पवन लोखंडे, बबलू तेलंग्रे, विकास लोखंडे, मन्नान खा, बंडू पवार तसेच जनता विद्यालय व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

उपस्थित मान्यवरांनी वानखेडे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Don`t copy text!