किसान स्पोर्ट्स अकॕडमीतर्फे आयोजित उन्हाळी शिबीराचे उद्घाटन संपन्न

किसान स्पोर्ट्स अकॕडमीतर्फे आयोजित उन्हाळी शिबीराचे उद्घाटन संपन्न….!!!!!

भडगाव (वार्ताहर) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,भडगाव शहरात किसान स्पोर्ट्स अकॕडमीच्या वतीने २१ दिवसीय वासंतिक शिबिराचे (समर कॕम्प) आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा संस्थेचे चेअरमन आदरणीय प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी प्राचार्या वैशाली पाटील,प्राचार्य संजय शिंदे,मुख्याध्यापक कमलेश शिंदे,प्राचार्य विद्या पवार,समन्वयक सुरेश गुजेला,आदर्श क्रीडा शिक्षक सतीश पाटील,आतिक सटोटे उपस्थित होते.

आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर खेळाशिवाय पर्याय नाही,वैश्विक महामारीत बंदिस्त झालेल्या मुलांना खुल्या नैसर्गिक आणि मुक्त वातावरणात आणून त्यांच्या अंतर्मनातील नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही स्पोर्ट्स अकॕडमीच्या माध्यमातून करीत असल्याचे आपल्या प्रास्ताविकातुन प्रा.प्रेमचंद चौधरी यांनी व्यक्त केले,यावेळी प्राचार्या वैशाली शिंदे,प्राचार्य संजय शिंदे,मुख्याध्यापक कमलेश शिंदे, यांनी देखील अकॕडमीच्या कामाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

२१ दिवस चालणाऱ्या या वासंतिक शिबीरात सहभागी खेळाडूंना स्केटींग,अॕथेलेटीक्स,डान्सींग,ड्रॉइंग,खो-खो,कबड्डी आदि कला व खेळाचे प्रशिक्षण निष्णात अशा प्रशिक्षकांच्या मार्फत देण्यात येणार असून सकाळ व संध्याकाळ या दोन सत्रात सराव शिबिर चालणार आहे.

स्केटींग प्रशिक्षक सुनिल मोरे,कला शिक्षक शरद पाटील,नृत्य विशारद मोसीम शेख,माजी विद्यापीठ खेळाडू तथा आदर्श क्रीडा शिक्षक सतीश पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी आदिंचे मार्गदर्शन लाभणार आहे.

सदर शिबिरास किसान स्पोर्ट्स अकॕडमीच्या विश्वस्त दुध फेडरेशनच्या संचालिका तथा संस्थेच्या सचिव डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या वैशाली पाटील,प्राचार्य रविंद्र वळखंडे,प्राचार्य सुनिल पाटील,प्राचार्य संजय शिंदे,प्राचार्य ए.एस.पाटील,मुख्याध्यापक अरुण बागुल,मुख्याध्यापक कमलेश शिंदे,मुख्याध्यापक बी.पी.पवार,मुख्याध्यापक आर.डी.महाजन,मुख्याध्यापक अभिजीत शिसोदे आदि तसेच संस्थेच्या सर्व शाखांवरील क्रीडा शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचालन प्रा.प्रेमचंद चौधरी यांनी केले तर आभार सतीश पाटील यांनी मानले तर संस्थेचे शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले.