आज भडगाव येथील कोविड सेंटरचा खासदार दादासो.उन्मेष पाटील यांच्या समवेत भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांनी घेतला आढावा

आज भडगाव येथील कोविड सेंटरचा खासदार दादासो.उन्मेष पाटील यांच्या समवेत भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांनी घेतला आढावा
भडगाव कोविड सेंटरला हायफ्लोटू यंत्रणा तातडीने उभारा खासदार उन्मेश दादा पाटील

भडगाव — येथील ग्रामीण रुग्णालय व आयटीआय येथील कोविड सेंटर मध्ये रुग्णांची देखभाल व्यवस्थित केली जात असली तरी येथे हायफ्लोटू यंत्रणा कार्यान्वित करावी, कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अकरा महिन्यांची ऑर्डर द्यावी जेणेकरून कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासणार नाही. असे प्रतिपादन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज भडगाव येथील कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर व्यक्त केले. आज दुपारी चार वाजता खासदार उन्मेशदादा पाटील यांनी भडगाव ग्रामीण रुग्णालय तसेच आय टी आय येथील कोविड सेंटर येथे भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली याप्रसंगी तहसीलदार सागर ढवळे व वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव, डॉ.प्रतिक भोसले यांनी भडगाव कोवीड सेंटर व ग्रामीण रुग्णालयाला असलेल्या अडचणींचा पाढा खासदार उन्मेशदादा पाटील यांच्यासमोर मांडला. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधून भडगाव सेंटरला असलेल्या अडचणी दूर कराव्यात. व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्या तसेच हायफ्लोटू यंत्रणा कार्यान्वित करा त्याच प्रमाणे कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना अकरा महिन्याची ऑर्डर द्या यासह विविध विषयात तातडीने जिल्हा आरोग्य विभागाने कार्यवाही करावी अशी सूचना केली याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, माजी तालुका अध्यक्ष सोमनाथदादा पाटील, माजी जि प सदस्य श्रावण लिंडायत, तालुका सरचिटणीस बंसीलाल परदेशी, शिवम सुराणा माजी सरपंच रवी आबा जामदेकर ,सामाजिक कार्यकर्ते शेषराव चव्हाण, पत्रकार शेख जावेद आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कोविड सेंटर मधील रुग्णांची वैयक्तिक विचारपूस करीत त्यांना दिलासा दिला.