नवजीवन विद्यालय पाचोरा येथे विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम

नवजीवन विद्यालय पाचोरा येथे विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम

येथे दिनांक ३ बुधवार रोजी पंधरा वर्षे वयोगटावरील विद्यार्थ्यांसाठी करोणा प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. प्रसंगी पाचोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत आलेल्या आरोग्यसेविका दिपाली भावसार, विनीता जाधव, आशा सेविका आम्रपाली देशपांडे यांच्यामार्फत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कोव्हॅक्सिन लस विद्यार्थ्यांना टोचण्यात आली. यात पंधरा वर्षे वयोगटावरील जवळपास बाहत्तर विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. येणार्या काळात होऊ घातलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षा त्यासोबतच कोरोना विषाणूपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण यादृष्टीने विद्यार्थ्यांसाठी लसीकरण महत्त्वाचे असून नवजीवन विद्यालय यात सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेत आहे. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस बी पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित वर्गाचे वर्गशिक्षक व विद्यालयातील शिक्षकांनी परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेतले.