चोपडा महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे ‘महात्मा फुले जयंती’ उत्साहात साजरी

चोपडा महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे ‘महात्मा फुले जयंती’ उत्साहात साजरी

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे ‘महात्मा फुले जयंती’ साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सुर्यवंशी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी तसेच महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए. वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. गोपाल बडगुजर म्हणाले की, ‘महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्यामुळे आज स्रिया सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर आहेत, याचे सर्व श्रेय महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना जाते’. याप्रसंगी त्यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक, राजकीय तसेच वाड्मयीन कर्तृत्वावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार डॉ. के. डी. गायकवाड यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.एल. बी. पटले, रोहन सोनवणे, धीरज राठोड यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थीत होते.