पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती नुतन सभापती, उपसभापती नवनियुक्त संचालक यांचा सत्कार सोहळा संपन्न

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती नुतन सभापती, उपसभापती नवनियुक्त संचालक यांचा सत्कार सोहळा संपन्न

पाचोरा तालुका प्राथमिक शिक्षक संघटनाच्या वतीने आयोजित दि.27/5/2023 शनिवार रोजी पाचोरा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघटनाच्या सर्व पदाधिकारी,तसेच तालुक्यातील शिक्षक बांधवानी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती नवनियुक्त सभापती बापूसो गणेश भिमराव पाटील उपसभापती दादासो पी ए पाटील आणि नवनियुक्त संचालक यांचा सत्कार सोहळा आयोजित केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांनी भुषवले.या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख जिभाऊसो मनोहर गिरधर पाटील,बापुसो पद्मसिंह पाटील,आप्पासो संजय पाटील,आप्पासो किशोर बारावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शेती आणि शेतकरी यांच्याशी जिव्हाळा आणि आपुलकी असलेल्या बापुसाहेब.गणेश पाटील यांची सभापती पदी निवड झाल्याने तालुक्यातील शेतकरीपुत्र असलेल्या तमाम शिक्षकांनी या प्रसंगी आनंद व्यक्त केला*