क्रिएटिव्ह स्कूलला भाषणे व विविध खेळ खेळून साजरा केला महिला दिन

क्रिएटिव्ह स्कूलला भाषणे व विविध खेळ खेळून साजरा केला उत्साहात महिला दिन

नांद्रा ता.पाचोरा (प्रतिनिधी) प्र सालाबादा प्रमाणे जागतिक महिला दिनानिमित्त परिसरातील महिला पालक वर्ग यांच्यासाठी हळदी कुंकू चा समारंभ व विविध प्रकारचे खेळ खेळून भरघोस अशा बक्षीसांचा वर्षाव क्रिएटिव्ह स्कूल नांद्रा येथे महिलादिनी साजरा करून करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या जळगाव शहर कोषाध्यक्ष प्रा. करुणा गरुड या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कुरंगी, माहीजी,वरसाडे,आसनखेडे,लासगाव बांबरुड, सामनेर नांद्रा, पहाण, हडसन येथील प्रातिनिधिक स्वरूपात एक महिला पालक प्रतिनिधी होत्या याबरोबरच विधवा भगिनी यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला याबरोबरच हळदी कुंकवानिमित्त आलेल्या प्रत्येक महिला भगिनींना हळदी कुंकू करंडक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, याबरोबरच गॅदरिंग मधील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना व विविध सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा सहभागी विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, एक मिनिट, महिलादिनी हिंदी इंग्रजी मराठी भाषणे, उखाणे नाव घेणे अशा स्पर्धा घेऊन विजेता महिला वर्ग यांना सेमी पैठणी साड्या याबरोबरच घरगुती वापरातील विविध वस्तू गिफ्ट म्हणूनही देण्यात आल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका वैशाली पाटील यांनी केले तर प्रास्ताविक नम्रता पवार, यशवंत पवार यांनी केले कार्यक्रम यशस्वी तेसाठी साठी अरुंधती राजेंद्र,पुनम सोनवणे,अनुराधा पाटील,सोनल गोसावी,पूजा सूर्यवंशी,सुभाष पिंपळे,नामदेव पाटील,नवल पाटील यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी विविध भाषणाद्वारे महिलांसाठी महिला देणे केलेल्या कार्यक्रमाचे आयोजन मुळे महिला भगिनी यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी खुले व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आभार प्रदर्शन नम्रता पाटील यांनी केले