काव्यरतनावली चौकात शहरातील सर्वात मोठे घरगुती गणपती मुर्ती संकलन केंद्र

काव्यरतनावली चौकात शहरातील सर्वात मोठे घरगुती गणपती मुर्ती संकलन केंद्र

_युवाशक्ती फाऊंडेशन आणि भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम_

अनंत चतुर्दशी निमित्त काव्यरत्नावली चौक येथे शुक्रवार दि. 9 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 ते सायं. 7 वाजेदरम्यान युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती मुर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. मागील 2 वर्षांपासून सदर गणपती मुर्ती संकलन केंद्र जळगावकर नागरिकांच्या सेवेसाठी जळगाव शहर महानगरपालिका व जळगाव जिल्हा पोलीस दल व सार्वजनिक गणेश महामंडळ यांच्या सहकार्याने सदर उपक्रम राबविण्यात येत असतो.
मेहरूण तलावावर विसर्जनाची होत असलेली गर्दी बघता या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. *घरगुती श्रींच्या मुर्त्या संकलीत करून विधीवतरित्या मेहरूण तलाव येथे* युवाशक्ती फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांतर्फे विसर्जित करण्यात येणार आहेत. 2020 मध्ये 3451 तसेच 2021 मध्ये 2871 मुर्त्यां काव्यरत्नावली चौकात संकलित झाल्या होत्या.

तरी जळगाव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात काव्यरत्नावली चौकातील संकलन केंद्रावर आपली घरगुती श्रींची मुर्ती विसर्जनासाठी संकलीत करावी असे आवाहान युवाशक्ती फाऊंडेशव व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, मनपा आयुक्त सौ. विद्या गायकवाड आदि. अधिकारी आपल्या घरगुती गणपती मुर्तींचे संकलन या केंद्रावर करणार आहेत.