म.न.पा.जिल्हास्तरीय १४ वर्षाआतील खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये अनुभूती इंग्लिश स्कूल तर मुलींमध्ये आर.आर.विद्यालय विजयी

_म.न.पा.जिल्हास्तरीय १४ वर्षाआतील खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये अनुभूती इंग्लिश स्कूल तर मुलींमध्ये आर.आर.विद्यालय विजयी….!!!!_

*जळगाव -* क्रीडा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी,कार्यालय,जिल्हा क्रीडा परिषद,जळगाव व जळगाव शहर महानगरपालिका,जळगाव द्वारा आयोजित,जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने,जळगाव जिल्हा क्रीडा संघ,येथे पार पडत असलेल्या १४ वर्षाआतील जिल्हास्तर शालेय खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये अनुभूती इंग्लिश स्कूल तर मुलींमध्ये आर.आर.विद्यालय संघाने विजेतेपद प्राप्त केले.
मुलांच्या चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात अनुभूती इंग्लिश स्कूलच्या संघाने विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश स्कूलचा पराभव करत विजेतेपद प्राप्त केले,विवेकानंद इंग्लिश स्कूल संघाने उपविजेतेपद प्राप्त केले तर तृतीयस्थानासाठी झालेल्या सामन्यात प्रगती माध्यमिक विद्यालयाने विजयी होत प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूलला पराभूत केले,तर मुलींच्या गटात आर.आर.विद्यालयाने चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात अनुभूती इंग्लिश स्कूलचा पराभव करत विजेतेपद प्राप्त केले तर अनुभूती स्कूल उपविजयी ठरले,तिसऱ्यास्थानासाठी झालेल्या सामन्यात विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश स्कूलने श्रीराम माध्यमिक स्कूलला पराभूत केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतराव पोळ,म.न.पा.क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सहसचिव जयांशु पोळ,जिल्हा सचिव राहुल पोळ,विद्या कलंत्री,अनिल माकडे,दत्ता महाजन,प्रेमचंद चौधरी,विशाल पाटील,तुषार सोनवणे,निरंजन ढाके,छगन मुखडे,गोपाल पवार,हर्षल बेडीस्कर,विजय क्षीरसागर,स्वप्निल पवार,केतन चौधरी,यश नेवे आदि मेहनत घेत आहे.
वैद्यकीय सेवेसाठी महापालिकेचे डॉ.प्रदुम्न सोनवणे,संजय पाटील,भगवान सपकाळ आदिंनी सहकार्य लाभत आहे.