जवखेडे खालसा येथे अखंड हरिनाम सप्ताहात कलशारोहण सोहळ्याचे आयोजन

जवखेडे खालसा येथे अखंड हरिनाम सप्ताहात कलशारोहण सोहळ्याचे आयोजन

(सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे जेष्ठ नेते उद्धवराव वाघ व ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहात हनुमान आणि शनी, गणपती, श्रीक्रुष्ण या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दि.६ ते१३ फेब्रुवारी या कालावधीत हा सोहळा संपन्न होत आहे.ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री, ज्ञानेश्वर माउली कराळे,निव्रुत्ती महाराज मतकर,रमेश अप्पा महाराज, श्रीरंग तळेकर महाराज, सोपान महाराज ढाकणे, यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे.शांतीपाठ,होमहवन, महापुजा हे सर्व विधी यथासांग पार पडणार आहेत. या काळात सर्व ह.भ.प.भगवान मचे, सुरेशानंद कोळेकर, सुधाकर वाघ, आदिनाथ दाणवे, बबनराव बहिरवाल, आदिनाथ शास्त्री , ज्ञानेश्वर कराळे, रामगिरी महाराज येळीकर,यांची किर्तने होणार आहेत.दि.१३/२/२०२४रोजी ह.भ.प.राम महाराज झिंजुर्के यांच्या काल्याच्या किर्तनाने नवनिर्वाचीत सरपंच चारूदत वाघ यांच्या महाप्रसादानंतर या सोहळ्याची सांगता होणार आहे.या सोहळ्यासाठी खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा बँकेचे चेरमन शिवाजीराव कर्डिले हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.तरी जवखेडे खालसा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन जवखेडे खालसाचे सरपंच चारुदत्त वाघ आणि पंचकमेटी,ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.