अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे मका पिकांचे मोठे नुकसान

*अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे मका पिकांचे मोठे नुकसान…*
– अवकाळीने हिरावला तोंडचा घास, शेतकरी हवालदिल मदतीची आशा….
पाचोरा ✒️ प्रतिनिधी
कडक उन्हात गार वारा आल्यावर मोठे आल्हादायक वाटते. परंतु शनिवारी संध्याकाळी वादळी वारे सोबतच पिकांचा
कर्दनकाळ ठरणारी गारपीट झाल्याने पाचोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या गारपीट आणि वादळी वायासह पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. गहू, हरभरा, तूर, तसेच अन्य भाजीपाल्याचे या अवकाळी पावसाने तर मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मका पिक हे शेतात जमीनदोस्त झालेले आहे या वादळी वारे सह गारपीटीने मोठे नुकसान केले आहे.
पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा, वाघुलखेडा, मोंढाळे आदी अनेक गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. तसेच मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने परिसरात वीज खंडित झाली होती. गावांमध्ये अवकाळीने शेतक-यांची झोप उडाली. या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राजु वाल्मिक पाटील (खडदेवळा), राजु चुडामण पाटील (मोंढाळे), संजय रामचंद्र पाटील (खडकदेवळा), उत्तम भालचंद्र पाटील यांचेसह परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे.