फलकेवाडी येथील रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाची गुरूवर्य रामगिरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता

फलकेवाडी येथील रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाची गुरूवर्य रामगिरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील फलके वाडी येथे रौप्य महोत्सवी वर्षातील अखंड हरिनाम सप्ताहाची ह.भ.प. गुरुवर्य रामगिरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या गौरवशाली अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. २२ते२९ एप्रिल या कालावधीत या अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.सर्व ह.भ.प.वैष्णवी महाराज तरटे, काकासाहेब महाराज मुखेकर, विठ्ठल महाराज डोईफोडे,धावणे महाराज सर, बाबासाहेब महाराज फलके, राजेंद्र महाराज मरकड, यांची प्रवचने तर सर्व ह.भ.प.गंगाराम महाराज राउत,मारुती महाराज झिरपे,भागवान महाराज मचे, उद्धव महाराज ढमाळ, उद्धव महाराज सबलस,ॲड. राजश्रीताई महाराज कडलक,यांची किर्तने झाली.मंगळवार दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी श्री ह.भ.प.वैराग्यमुर्ती रामगिरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि अशोक महाराज येवले यांच्या महाप्रसादाच्या पंगतीने या गौरवशाली रौप्य महोत्सवी वर्षातील सप्ताहाची सांगता झाली. ह.भ.प.रामगिरी महाराज येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहास पंचवीस वर्षे पूर्ण झाले आहेत.त्याची आठवण म्हणून त्यांनी आज काल्याच्या किर्तना प्रसंगी संकल्प केला की तीर्थक्षेत्र महान तपोभुमी (दक्षिण मुखी मारुती)फलकेवाडी येथे राज्य मार्ग महामार्गावर मोठी कमान बांधण्यासाठी हा संकल्प केला आहे. ह.भ.प.रामगीरी महाराज पुढे म्हणाले की साधुची क्रुपा नसेल, पुर्व जन्मीचे पुण्य नसेल तर त्याच्या जिवनात अर्थ नाही.संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील गौळणपर प्रकरणातील अभंग या सेवेसाठी निवडला होता.तो असा की “कोणी एके भुलली नारी,विकिता गोरस घ्या म्हणे हरी” या अभंगावर महाराजांनी विवेचन केले. गोकुळातील गौळण मथुरेत दही,दुध, लोणी विकण्यासाठी जात होती. महाराज पुढे म्हणाले की असा व्यापार करा की ज्या व्यापारातून आपल्या मुलाबाळांना आशिर्वाद मिळेल. शामसुंदर भगवान परमात्मा त्या गोपिकेने पाहिला.त्यानंतर ती गोपिका म्हणते गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे.जिवन जगताना आणि परमार्थ करताना त्या असणाऱ्या गौळणीला काही स्त्रिया हसतात त्या हसण्याचा परीणाम असा झाला की त्या भगवान परमात्म्याला त्या गौळणीने पाहीले असता ती गौळण आपले पणाला विसरून गेली आणि आपले चित्त हरवून गेली.आणि त्या गौळणीला भगवंताचे दर्शन झाले.भगवान परमात्म्याने रांगत असताना गोकुळात चरीत्र केले.बंदीशाळेत भगवान परमात्मा जन्माला आल्यावर कारागृहाची कुलुपे आपोआप गळून पडली. वैकुंठवासी भगवानबाबा जन्माला आले त्या दिवशी सावरगाव या गावात सर्वत्र लाईटचे दिवे आपोआप लागले. वै.बंकटस्वामी मातेच्या उदरात बारा महिने राहीले.भगवान परमात्मा जन्माला आल्यावर आठ वर्षांचे होते. या धर्म मंडपात कळत नकळत चुक झाली असल्यास येथे हरीनामाचा प्रसाद सेवन केल्याने एका जन्माचा नाही तर अनेक जन्माचा दोष नाहीसा होतो असे ह.भ.प.रामगीरी महाराज येळीकर यांनी सांगितले.या प्रसंगी म्रुदुंगाचार्य पांडुरंग महाराज धस, किशोर महाराज फलके, प्रल्हाद महाराज सोनवणे,गायनाचार्य ह.भ.प.युवा किर्तनकार भागवत महाराज मरकड,ह.भ.प.निव्रुती महाराज फलके, अभिमन्यू महाराज मरकड, राजेंद्र महाराज मरकड, संदिप महाराज लवांडे, भाऊसाहेब महाराज शिदोरे, राजेंद्र महाराज फलके,तेजस महाराज नरवडे, ज्ञानेश्वर महाराज सोनवणे, सचिन महाराज काळे,आणि गुरूदत्त महीला व पुरुष भजनी मंडळ फलकेवाडी हे आवर्जून उपस्थित होते.