विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य विकसित केले पाहिजे — प्रा. शिवाजी शिंदे

विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य विकसित केले पाहिजे — प्रा. शिवाजी शिंदे

पाचोरा-
“जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरु आणि पालकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. जीवनातील ध्येय गाठण्यासाठी स्वतःच्या अंगभूत कौशल्याचा सातत्याने विकास करावा” असे आवाहन प्रा शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना केले
कै.पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालय पाचोरा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित कैपिके शिंदे माध्यमिक विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ काल तारीख 17 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.तात्यासाहेब पंडितराव शिंदे, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव प्रा.शिवाजी शिंदे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री एस व्ही गीते सर यांनी केले. कार्यक्रमात कु.संजीवनी बाविस्कर, प्रितेश पाटील, कु.गायत्री पाटील, महेंद्र सोनवणे, कु.आदिती देव, वैभव शुक्ला या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकांच्या वतीने डी.आर. कोतकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा.शिवाजी शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या उदाहरणातून मौलीक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेवर मिळणारे मार्क त्यासोबतच आपले कौशल्य विकसित केले पाहिजे. चांगले मित्र आणि चांगले संस्कार माणसाला यश देऊन जातात असेही ते शेवटी आपल्या भाषणात म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत टोणपे सर यांनी केले. आभार प्रदर्शन आबा पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इ.10 वी (अ) व (ब) चे वर्गशिक्षक जी.व्ही.सोमवंशी सर, एस. ई. पाटील सर, व्ही. पी.देशमुख सर, राजूभाऊ सोनवणे आणि इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.